केंद्र सरकार 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र उघडण्याची संधी देत आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. 406 जिल्ह्यांतील एकूण 3579 ब्लॉक या नवीन अर्जाच्या कक्षेत येतील.
सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतीय जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, सरकारी नामांकित संस्था, एनजीओ, ट्रस्ट, सोसायटी इत्यादींकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. हे अर्ज ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मागविण्यात आले आहेत.
इच्छुक अर्जदार PMBI वेबसाइट http://janaushadhi.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्र अर्जदारांना “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” तत्त्वावर PMBJP च्या नावाने औषध परवाना मिळविण्यासाठी तत्वतः मान्यता दिली जाईल.
सरकारचे ध्येय आहे :-
आपणास सांगूया की सरकारने मार्च 2024 पर्यंत जनऔषधी केंद्रांची संख्या 10000 पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील सर्व 739 जिल्ह्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. लहान शहरे आणि ब्लॉक मुख्यालयातील रहिवासी देखील आता जन औषधी केंद्रे उघडण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकतात.
ही योजना महिला, SC/ST, डोंगरी जिल्हे, बेट जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांसह विविध श्रेणींना प्रोत्साहन देते. यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत परवडणारी औषधे पोहोचणे सोपे होईल. http://janaushadhi.gov.in वर योजनेच्या तपशीलवार अटी व शर्ती पाहता येतील.