ट्रेडिंग बझ – चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी सेंट्रल बँक RBI च्या शेवटच्या MPC बैठकीत निर्णय आला आहे. RBI ने रेपो रेट 25 bps ने (0.25 टक्के) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. MPC (मॉनेटरी पॉलिसी कमिटी) च्या 6 पैकी 4 सदस्यांनी रेपो दर वाढवण्याच्या बाजूने मतदान केले. 0.25 टक्क्यांच्या वाढीनंतर ते आता 6.50 टक्के झाले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरणांसाठी स्थापन केलेल्या समितीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर ही घोषणा केली. रेपो दर गेल्या वर्षी मे 2022 पासून सहा वेळा तब्बल 2.25 टक्क्यांनी वाढला आहे.
दरवाढीचा रेपो दरावर कसा परिणाम होतो ? :-
रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचे हप्ते महाग होतात. यामुळे, जर तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृह कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असेल तर त्याचा ईएमआय वाढेल. दुसरीकडे, रेपो रेट वाढल्यानंतर बँका एफडीसह ठेवींवर अधिक व्याज देऊ शकतात, याचा अर्थ ठेव दर वाढू शकतात आणि याचा सामान्य जनतेवर कळतनकळत परिणाम होतो.