ट्रेडिंग बझ –भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने गेल्या बुधवारी तिच्याद्वारे नियंत्रित केलेल्या विविध बाजारांसाठी व्यापाराचे तास वावाढवले होते 12 डिसेंबरपासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या नवीन वेळा लागू होणार होता, पण काहींना अनेक प्रश्न पडले असेल जसे की मार्केट चे तास वाढवले तरी सोमवारच्या सत्रात मार्केट नेहमीच्या म्हंणजेच 03:30 लाच का बंद झाले ? चला तर मग ह्यासारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर बघुया …
हा टाईम कोणासाठी आहे ? :-
नवीन वेळेनुसार, कॉल/नोटीस/टर्म मनी मार्केट संध्याकाळी 5 वाजता बंद होईल, कमर्शियल पेपर आणि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटचा बाजार संध्याकाळी 5 वाजता बंद होईल, कॉर्पोरेट बाँड्समधील रेपो 5 वाजता संपेल आणि रुपया व्याज दर डेरिव्हेटिव्ह ही दुपारी 5 वाजता संपेल. या सर्वांसाठी हा टायमिंग आहे.
मध्यवर्ती बँकेने सांगितले की सामान्य तरलता ऑपरेशन्सकडे हळूहळू वाटचाल करण्याचा एक भाग म्हणून, आता पूर्वीप्रमाणे बाजाराचे तास पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“मनी मार्केटच्या कॉर्पोरेट बाँड विभागांमध्ये कॉल/नोटीस/टर्म मनी, कमर्शियल पेपर, डिपॉझिटचे प्रमाणपत्र आणि रेपो तसेच रुपयाच्या व्याजदर डेरिव्हेटिव्हजसाठी बाजाराचे तास पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, 12 डिसेंबर 2022 पासून, रिझर्व्ह बँकेने नियंत्रित केलेल्या बाजारांसाठी सुधारित व्यापाराचे तास खालीलप्रमाणे आहेत,” असे RBI ने अधिकृत प्रकाशनात म्हटले होते.