ट्रेडिंग बझ – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच 17 सप्टेंबर 2022 रोजी 72 वर्षांचे झाले. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या या सरकारच्या कार्यकाळाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी जनतेच्या हितासाठी अनेक मोठे निर्णय घेतले. आज त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांनी सुरू केलेल्या काही प्रमुख योजनांबद्दल (PM Modi schemes) बद्दल सांगनार आहोत, ज्यांचा सर्वसामान्यांना प्रचंड फायदा होत आहे.
1. पीएम किसान :-
मोदी सरकारने 2018 साली ‘पीएम किसान सन्मान निधी योजना’ सुरू केली होती. या योजनेंतर्गत अल्प व मध्यमवर्गीय शेतकर्याला शासनाकडून दरवर्षी 6000 रुपयांची मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपये झाल्यानंतर ही रक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली जाते. याचा लाभ करोडो शेतकऱ्यांना मिळत आहे.
2. सुकन्या समृद्धी योजना :-
सुकन्या समृद्धी योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये सुरू केली होती. ही योजना मुलींसाठी आहे. ही योजना पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलींचे पालक त्यांच्या मुलीच्या नावाने हे खाते उघडू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत वार्षिक 7.8 टक्के व्याज मिळते. सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात परिपक्व होत आहे
3. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना :-
मोदी सरकारने 2016 मध्ये ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजना’ सुरू केली. गरिबांना मोफत गॅस कनेक्शन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. आतापर्यंत कोट्यवधी गरीबांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
4. पीएम जन धन योजना :-
2014 मध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांना बँकिंगशी जोडण्यासाठी ‘जन-धन योजना’ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 44 कोटींहून अधिक लोकांची खाती उघडण्यात आली आहेत. जन धन खात्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या खात्यात पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
5. PM मुद्रा कर्ज योजना :-
‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ (PMMY) मोदी सरकारने 2015 साली सुरू केली. या योजनेंतर्गत रोजगार सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. मुद्रा योजनेअंतर्गत व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सूक्ष्म वित्त संस्था (MFIs) आणि NBFC मार्फत कर्ज दिले जात आहे. देशभरातील लाखो लोकांना त्याचा लाभ मिळत आहे