बंपर परतावा; केवळ १००० रुपयाच्या गुंतवणुकीवर मिळणार तब्बल २ करोड रुपये, तपशील बघा..

ट्रेडिंग बझ – सध्याच्या वाढत्या गरजा आणि बदलती जीवनशैली यादरम्यात सुरक्षित गुंतवणूक (safe investment) कडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे म्हंटले जाते की गुंतवणुकीला कुठलीही लिमिट आणि वेळ नसते, खरे आहे. आपण जेव्हा गुंतवणुक सुरू करू तीच योग्य वेळ समजावे. तरीपण तुम्ही अजूनही गुंतवणुक करणे सुरू केले नसेल तर अजून पण वेळ गेलेली नाहीये , ह्या दिवाळी च्या शुभ मुहूर्तावर तुम्ही गुंतवणुक करणे सुरू करू शकतात, आज फक्त दहा हजार रुपये गुंतवून तुम्ही भविष्यात करोडपती होऊ शकतात, ते कसे चला तर बघुया…

तुम्ही केवळ १० हजारांपासून गुंतवणूक सुरू करू शकतात :-
जर तुम्ही भरपूर मेहनत करूनही जास्त पैसे वाचवू शकत नाही आहात तर आम्ही तुम्हाला सांगतो की कसे छोटी छोटी गुंतवणुक करून तुम्ही मोठा फंड तयार करू शकतात. (Large Fund with Small Investment) याची सुरुवात तुम्ही केवळ १० हजार रुपयांपासून ही करू शकतात.

१० हजाराचे करोडो कसे होणार :-
इथे आपण म्युच्युअल फंड विषयी बोलणार आहोत. तुम्ही केवळ १० हजार रुपयांची दरमहा SIP (Systematic Investment Plan) सुरू करून करोडपती होऊ शकतात. तर हे कसे शक्य आहे ? याच्यासाठी तुम्हाला दरमहा १० हजार रुपये म्युच्युअल फंड मध्ये SIP स्वरूपात गुंतवावे लागतील, मागील काही वर्षात म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना २० टक्क्यांहून अधिकधिक परतावा दिला आहे.

जर तुम्ही २० वर्ष गुंतवणुक सुरू ठेवली तर ? :-
आपण वरती बोललो की १० हजार रुपयांची दरमहा गुंतवणुक म्युचुअल फंड मध्ये करावी लागेल, जर तुम्ही २० वर्षापर्यंत हे दरमहा गुंतवणुक करत राहिले तर या काळात तुम्ही एकूण २.४ लाख रुपये जमा करणार आहात,आणि त्यावर २० वर्षात १५ टक्यांच्या परतावा नुसार तुम्हाला एकूण १५ लाख १६ हजार रुपये मिळतील आणि जर तुम्हाला ह्या गुंतवणुकीवर २० टक्के परतावा मिळत असेल तर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम ही ३१.६१ लाख असेल.

३० वर्षांच्या गुंतवणुकीवर :-
जर तुम्ही ही गुंतवणूक २५ वर्षापर्यंत सुरू ठेवली तर तुम्हाला २० टक्क्यानुसार मिळणारा परतावा एकूण ८६.२७ लाख असेल , याप्रमाणे जर तुम्ही गुंतवनूकीचा काळ वाढवला आणि जर ३० वर्षापर्यंत ही गुंतवणूक सुरू ठेवली तर तुम्हाला २० टक्क्यांच्या परतावा नुसार तब्बल २ करोड ३३ लाख ६० हजार रुपये मिळतील.

म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना कंपाऊंदिंग चा फायदा मिळत असतो,सोबत प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करण्याची सुविधा असते , यामुळेच छोट्या छोट्या गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळण्याची अपेक्षा असते.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version