ट्रेडिंग बझ – शेअर बाजारात खालच्या पातळीवरून जोरदार रिकव्हरी होताना दिसत आहे. सेन्सेक्स 61200 च्या वर तर निफ्टी 18000 च्या वर व्यवहार करत आहे. मार्केट रिकव्हरीमध्ये सर्वात मोठा हातभार म्हणजे हेवीवेट स्टॉक्समधील रिटर्न बायिंग. यामध्ये RIL, L&T, ULTRATECH, MARUTI या शेअर्सचा समावेश आहे. सकाळपासूनच शेअर बाजाराला सुरुवात झाली त्याचसोबत अमेरिकेत व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे अमेरिकी बाजारासह आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण दिसून आली. आयटी, फार्मा आणि पीएसयू बँकिंग शेअर्स घसरणीत आघाडीवर आहेत. यापूर्वी 16 फेब्रुवारी रोजी वरच्या स्तरावरून शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. सरतेशेवटी, सेन्सेक्स 44 अंकांच्या किंचित वाढीसह 61,319 वर बंद झाला होता, ज्याने इंट्राडेमध्ये 61,682 च्या सर्वोच्च पातळीला देखील स्पर्श केला होता, बाजारातील नरमाईमध्ये बँकिंग आणि वित्तीय शेअर्स आघाडीवर होते.
शेअर बाजाराची स्थिती :-
शेअर बाजारात आज कमजोरी आहे. BSE वर उपलब्ध आकडेवारीनुसार, 2591 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यामध्ये 1095 शेअर लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. तर 96 शेअर लोअर सर्किटला आले आहेत. एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 267.74 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
नेस्लेचा शेअरमध्ये घसरण :-
MNC कंपन्यांमध्ये रॉयल्टी भरण्याची मोठी समस्या.
नेस्लेचे रॉयल्टी पेमेंट 2024 मध्ये नूतनीकरण केले जाईल.
नेस्ले इंडिया मूळ कंपनीला 4.5% रॉयल्टी देते.
मार्केटमध्ये रॉयल्टी वाढण्याची भीती, कारण नुकतेच HUL ने रॉयल्टी पेमेंट वाढवले होते. या सर्व कारणांमुळे नेस्ले चे शेअर घसरले.
ट्विटरने भारतातील कार्यालये बंद केली :-
मायक्रो ब्लॉकचेन कंपनी खर्च करण्याचा प्रयत्न करत आहे.
भारतातील दिल्ली आणि मुंबई येथील 2 कार्यालये बंद केली.
व कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगितले.
बाजारतील तज्ञांनी शेअर्स वर रेटिंग दिले आहे :-
जेपी मॉर्गन
नेस्ले इंडिया
रेटिंग – ओव्हरवेट (buy)
टार्गेट – 21200