नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजाराने बुधवारी एक विक्रम नोंद केला आहे. आजच्या व्यापार सत्रात बीएसईचा निर्देशांक पहिल्यांदाच 53000 चा टप्पा पार करण्यात सफल झाला आहे. त्यासोबतच एनएसईचा निफ्टीही विक्रमी पातळीवर बंद झाला आहे. आजच्या या व्यापार सत्रात बाजार घसरणीने सुरु झाला होता. काही दिवसांतील व्यापार सत्रात बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता जाणवली. मात्र अखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी रेकॉर्ड लेबल्सवर राहू शकली. बुधवारच्या व्यापार सत्रात मिडकॅप 179 अंकांनी वाढून 27328 वर बंद झाला. तसेच दुसरीकडे निफ्टी बँक 192 अंकांवर चढत 35771 च्या पातळीवर बंद झाला.
बीएसईचा सेन्सेक्स बुधवारी 194 अंकांनी वाढला. पहिल्यांदाच तो 53,000 च्या वर गेला. एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, टाटा स्टील आणि आयसीआयसीआय बँक या बाजाराच्या निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाटा आहे. बीएसईचा समभाग असलेला सेन्सेक्स 193.58 अंक म्हणजेच 0.37 टक्क्यांनी वाढत 53,054.76 च्या विक्रमी उच्चांकावर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 61.40 अंकांनी किंवा 0.39 टक्क्यांनी वाढीसह 15,879.65 च्या मोठ्या पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्सच्या शेअर्समध्ये चार टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह टाटा स्टीलचा समभाग मोठ्या प्रमाणात वाढला. बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, एचडीएफसी, नेस्ले इंडिया, एशियन पेंट्स आणि सन फार्मा हे समभाग तेजीत असतांना टायटन, मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टेक महिंद्रा यासह इतर समभाग मात्र तोट्यात गेले.
Tag: #jhunjhunwla
झुनझुनवालांच्या पोर्टफोलियोतील शेअरचा 190 % परतावा
शेअर बाजारात ‘बिग बुल’ म्हणून समजले जाणारे राकेश झुनझुनवाला यांची ख्याती आहे. त्यांनी घेतलेले शेअर्स चांगला रिटर्न देणार असे गुंतवणूकदार समजतात. गेल्या वर्षी झुनझुनवाला यांनी खरेदी केलेल्या एका पेनी स्टॉकने वर्षभरात गुंतवणूकदारांना तब्बल 190 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमध्ये नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीचा शेअर गेल्या 12 महिन्यात वेगवान ठरला आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या शेअरची किंमत 32.05 रुपये एवढी होती. मंगळवारी या शेअरची किंमत 92.85 रुपयांवर गेली. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 190 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत सेन्सेक्स देखील 45 टक्क्यांनी वाढला आहे.
मागील वर्षी ज्या गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये 5 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्यांना या शेअरने तब्बल 14.48 लाख रुपयांची कमाई करुन दिली. गेल्या सहा महिन्यात हा शेअर 59 टक्क्यांनी वाढला. हैद्राबादच्या या कंपनीत राकेश झुनझुनवाला यांच्यासह त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची 12.84 टक्के एवढी भागिदारी आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 6 कोटी 67 लाख 33 हजार 266 शेअर (10.94 टक्के) आणि त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 16 लाख शेअर (1.90 टक्के) आहेत.