ख्रिसमसपूर्वी सोने महागले, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा ताजा भाव

डिसेंबर महिना चालू आहे, हे वर्ष 2023 देखील लवकरच संपणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजेच गुरुवार, 21 डिसेंबर रोजी भोपाळमध्ये (मध्य प्रदेश सोन्याची किंमत आज) 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत रु. 61,560 प्रति 10 ग्रॅम.

Jalgaon

सोन्याचे भाव वाढले
(भोपाळ सोन्याचा आजचा भाव)  भोपाळच्या सराफा बाजारात काल म्हणजेच बुधवारी (22 के सोने) 22 कॅरेट सोने 58,180 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर (24 के सोने) 24 कॅरेट सोने 61,090 रुपये प्रति 10 दराने विकले गेले. ग्रॅम म्हणजेच सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे
जर आपण चांदीबद्दल बोललो तर, भोपाळच्या सराफा बाजारात बुधवारी 79,700 रुपये प्रति किलोने विकली जाणारी चांदी आज शनिवारी 80,200 रुपये प्रति किलोने विकली जाईल.

जळगाव जिल्ह्यात आजचे पेट्रोल व डीझेल चे दर तपासा

जळगावात पेट्रोलचे दर

जळगाव (महाराष्ट्र) मध्ये आज पेट्रोलचा दर रु. 106.42 प्रति लिटर. जळगावच्या पेट्रोलच्या दरात शेवटचा बदल 12 नोव्हेंबर 2022 रोजी झाला होता आणि तो -1.22 रुपयांनी कमी झाला होता. गेल्या 10 दिवसांपासून जळगावात पेट्रोलच्या दरात 106.15 ते 107.64 रुपयांपर्यंत चढ-उतार होत आहे. तुम्ही आज महाराष्ट्रातील इतर भागातील पेट्रोलचे दर आणि मागील दिवसाच्या तुलनेत किंमतीतील बदल देखील तपासू शकता. पेट्रोलच्या किमतीत महाराष्ट्र राज्याच्या करांचा समावेश होतो.

  • जळगाव

Date Price
Nov 13, 2022 106.42 ₹/L
Nov 12, 2022 107.64 ₹/L
Nov 11, 2022 106.15 ₹/L
Nov 10, 2022 107.64 ₹/L
Nov 09, 2022 106.46 ₹/L
Nov 08, 2022 107.43 ₹/L
Nov 07, 2022 106.42 ₹/L
Nov 06, 2022 106.89 ₹/L
Nov 05, 2022 107.19 ₹/L
Nov 04, 2022 107.33 ₹/L
  • महाराष्ट्रातील इतर शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर

City/District Price
Ahmadnagar 106.27 ₹/L
Akola 106.37 ₹/L
Amravati 107.44 ₹/L
Aurangabad 107.39 ₹/L
Bhandara 107.01 ₹/L
Bid 106.51 ₹/L
Buldhana 106.82 ₹/L
Chandrapur 106.12 ₹/L
Dhule 106.13 ₹/L
Gadchiroli 107.26 ₹/L
Gondia 107.53 ₹/L
Greater Mumbai 106.31 ₹/L
Hingoli 107.06 ₹/L
Jalgaon 106.42 ₹/L
Jalna 107.91 ₹/L
Kolhapur 107.45 ₹/L
Latur 107.25 ₹/L
Mumbai City 106.31 ₹/L
Nagpur 106.04 ₹/L
Nanded 108.50 ₹/L
Nandurbar 107.22 ₹/L
Nashik 106.72 ₹/L
Osmanabad 106.92 ₹/L
Palghar 106.39 ₹/L
Parbhani 109.47 ₹/L
Pune 106.61 ₹/L
Raigarh 107.11 ₹/L
Ratnagiri 107.47 ₹/L
Sangli 106.05 ₹/L
Satara 106.76 ₹/L
Sindhudurg 107.97 ₹/L
Solapur 106.77 ₹/L
Thane 106.38 ₹/L
Wardha 106.53 ₹/L
Washim 106.95 ₹/L
Yavatmal 107.45 ₹/L

जळगावात डिझेलचे दर

जळगाव (महाराष्ट्र) मध्ये आज डिझेलचा दर रु. 92.94 प्रति लिटर. जळगावच्या डिझेलच्या दरात शेवटचा बदल 12 नोव्हेंबर 2022 रोजी झाला होता आणि तो -1.17 रुपयांनी कमी झाला होता. गेल्या 10 दिवसांत जळगावात डिझेलच्या दरात 92.68 ते 94.11 रुपयांपर्यंत चढ-उतार होत आहे. तुम्ही आज महाराष्ट्रातील इतर भागातील डिझेलचे दर आणि मागील दिवसाच्या तुलनेत किंमतीतील बदल देखील तपासू शकता. डिझेलच्या किमतीत महाराष्ट्र राज्याच्या करांचा समावेश आहे.

 

  • जळगावात गेल्या दहा दिवसातील डिझेलचे दर

Date Price
Nov 13, 2022 92.94 ₹/L
Nov 12, 2022 94.11 ₹/L
Nov 11, 2022 92.68 ₹/L
Nov 10, 2022 94.11 ₹/L
Nov 09, 2022 92.98 ₹/L
Nov 08, 2022 93.90 ₹/L
Nov 07, 2022 92.94 ₹/L
Nov 06, 2022 93.38 ₹/L
Nov 05, 2022 93.70 ₹/L
Nov 04, 2022 93.83 ₹/L

 

जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंची विदर्भ तायक्वांडो युथ फायटर्स स्पर्धेत पदकांची लयलुट

जळगाव दि.०५ प्रतिनिधी – जिल्हा अमरावती येथे झालेल्या युथ फायटर्स पहिली विदर्भ तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडेमी च्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ११ रौप्य, १३ कांस्यपदक पटकावून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ही दि. २९ ते ३० जून दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत जळगाव, पुणे,नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, अमरावती,जालना, येथिल ४०० च्या वर खेळाडूंनी सहभाग घेतला यात जळगाव येथील ५४ खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला स्पर्धेतील प्रथम विजेते खेळाडू पुष्पक महाजन, श्रेयांग खेकारे, दिनेश चौधरी, यश जाधव, रोहन लोणारी,धनश्री गरूड, स्वराली वराडे, वंशिका मोताले यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. यात रौप्य पदक विजेते पुढील प्रमाणे : जयेश पवार, लोकेश महाजन, यश शिंदे, निकीता पवार, समृद्धी बागुल, दर्शन कानवडे, दर्शन बारी, साहिल बागुल, जयदीप परदेसी, नियती गंभीर, ऋतिका खरे, आभा बाजट यांचा समावेश आहे.
कास्य पदक विजेत्यांमध्ये प्रविण खरे, जिवनी बागुल,ललित महाजन, संकल्प गाढे, खुशी बारी, अनिरुद्ध महाजन, परमऱश्री सोनार, दानिश तडवी, हेमंत गायकवाड, चैतन्य जोशी, अर्नव जोशी, तन्मय माटे, साहिल बेग इत्यादी सर्व विजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक जयेश कासार, जयेश बाविस्कर, जिवन महाजन, ( रावेर ) अमोल राठोड ( जळगाव ) श्रीकृष्ण देवतवाल (शेदुंर्णी ) सुनील मोरे ( पाचोरा ) तसेच मुख्य प्रशिक्षक अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. या सर्व विजेत्या खेळाडूचे संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, खजिनदार सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, नरेंद्र महाजन, अरविंद देशपांडे तसेच रावेर संघटनेचे अध्यक्ष दिपक नगरे, डाॅ. संदीप पाटील, डाॅ. सुरेश महाजन, रविंद्र पवार, सौ. मनीषा पवार, श्रीकांत महाजन, जे. के. पाटील सर , राहुल पाटील, श्रीकृष्ण चौधरी, हरिभाऊ राऊत आदींनी कौतूक केले

पर्यावरण समतोलासाठी वृक्षसंवर्धन महत्त्वाचे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव दि.4 प्रतिनिधी – ‘सध्या पाऊस लांबला, मागील वर्षी अतिवृष्टी झाली मान्सून मधील अनियमिता पर्यावरणाचा समतोल बिघडल्यानेच होत आहे. जैवविविधतेसह पर्यावरणाचे संवर्धन केले नाही, तर पुढच्या पिढीला काय उत्तर देणार हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे, यातूनच वृक्षारोपणासह, वृक्षसंवर्धनाचे कार्य करावे यासाठी व्यापक स्वरूपात लोकसहभाग अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले.’
मेहरूण तलाव परिसरातील पक्षी घराजवळ झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते. जैन इरिगेशनच्या अनमोल सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे सुरू असलेल्या वृक्षारोपणाच्या उपक्रमाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमिल देशपांडे, सचिव विजय वाणी,उद्योजक नंदू आडवाणी, सौ. संध्या वाणी, सौ. निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार, सौ. सुमित्रा पाटील, दीपक धांडे, संतोष क्षीरसागर, रमेश पहेलानी, समाजसेवक अनिल सोनवणे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, वरिष्ठ सहकारी अनिल जोशी उपस्थितीत होते. गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या तीन वर्षापासून मेहरूण तलावाच्या काठावर सातत्याने वृक्षारोपणाचे काम सुरू असून झाडांची देखरेखही ठेवली जाते. यामध्ये आता एक हजार झाडे लावण्यात येणार आहे. याची सुरवात आज मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपणाने झाली.

जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी वृक्षारोपण उपक्रमास शुभेच्छा देताना सांगितले की, ‘शासनाने नेहमीच पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन दिले आहे. यावर्षी शाळांसाठी रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासंबंधित लांडोरखोरी उद्यान येथे लवकरच स्टॉल लावणार असल्याचे विवेक होशिंग म्हणाले.’ जैन इरिगेशनचे अतिन त्यागी यांनी कंपनी करित असलेल्या वृक्षसंवर्धनाच्या कार्याबद्दल सांगितले. वृक्षारोपण ही संकल्पना व्यापक स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून शास्त्रीय पद्धतीने, स्थानिक मातीत वाढणारी, जैवविविधता जपणारी झाडं गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे लावली जात आहे. यामध्ये समाजातील सेवाभावी संस्था, व्यक्ती, समाज सर्वांनी सहकार्य वाढवावे जेणे करून हरित जळगावचे स्वप्न साकारता येईल. असे अतिन त्यागी म्हणाले.’ ऍड. जमिल देशपांडे यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा ध्यास घेऊन मराठी प्रतिष्ठान व गांधी रिसर्च फाऊंडेशन करित असलेल्या कार्याविषयी माहिती दिली. विजय वाणी यांनी आभार मानले. आजच्या वृक्षारोपणाप्रसंगी रमेश पहेलानी यांच्यासह गायक कलावंतांनी योगदान दिले.
*फोटो कॅप्शन* – मेहरूण तलाव परिसरात एक हजार झाडे लावण्याच्या उपक्रमाचा वृक्षारोपण करून शुभारंभ करताना महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्ह्याचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, ऍड. जमिल देशपांडे, विजय वाणी, डॉ. सविता नंदनवार, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, सुमित्रा पाटील, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे उदय महाजन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी अनिल जोशी, अतिन त्यागी व मान्यवर.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version