पर्यावरण समतोलासाठी वृक्षसंवर्धन महत्त्वाचे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव दि.4 प्रतिनिधी – ‘सध्या पाऊस लांबला, मागील वर्षी अतिवृष्टी झाली मान्सून मधील अनियमिता पर्यावरणाचा समतोल बिघडल्यानेच होत आहे. जैवविविधतेसह पर्यावरणाचे संवर्धन केले नाही, तर पुढच्या पिढीला काय उत्तर देणार हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे, यातूनच वृक्षारोपणासह, वृक्षसंवर्धनाचे कार्य करावे यासाठी व्यापक स्वरूपात लोकसहभाग अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले.’
मेहरूण तलाव परिसरातील पक्षी घराजवळ झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते. जैन इरिगेशनच्या अनमोल सहकार्यातून गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे सुरू असलेल्या वृक्षारोपणाच्या उपक्रमाप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड. जमिल देशपांडे, सचिव विजय वाणी,उद्योजक नंदू आडवाणी, सौ. संध्या वाणी, सौ. निलोफर देशपांडे, डॉ. सविता नंदनवार, सौ. सुमित्रा पाटील, दीपक धांडे, संतोष क्षीरसागर, रमेश पहेलानी, समाजसेवक अनिल सोनवणे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, वरिष्ठ सहकारी अनिल जोशी उपस्थितीत होते. गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या तीन वर्षापासून मेहरूण तलावाच्या काठावर सातत्याने वृक्षारोपणाचे काम सुरू असून झाडांची देखरेखही ठेवली जाते. यामध्ये आता एक हजार झाडे लावण्यात येणार आहे. याची सुरवात आज मान्यवरांच्याहस्ते वृक्षारोपणाने झाली.

जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी वृक्षारोपण उपक्रमास शुभेच्छा देताना सांगितले की, ‘शासनाने नेहमीच पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहन दिले आहे. यावर्षी शाळांसाठी रोपे उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासंबंधित लांडोरखोरी उद्यान येथे लवकरच स्टॉल लावणार असल्याचे विवेक होशिंग म्हणाले.’ जैन इरिगेशनचे अतिन त्यागी यांनी कंपनी करित असलेल्या वृक्षसंवर्धनाच्या कार्याबद्दल सांगितले. वृक्षारोपण ही संकल्पना व्यापक स्वरूपात सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून शास्त्रीय पद्धतीने, स्थानिक मातीत वाढणारी, जैवविविधता जपणारी झाडं गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे लावली जात आहे. यामध्ये समाजातील सेवाभावी संस्था, व्यक्ती, समाज सर्वांनी सहकार्य वाढवावे जेणे करून हरित जळगावचे स्वप्न साकारता येईल. असे अतिन त्यागी म्हणाले.’ ऍड. जमिल देशपांडे यांनी ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा ध्यास घेऊन मराठी प्रतिष्ठान व गांधी रिसर्च फाऊंडेशन करित असलेल्या कार्याविषयी माहिती दिली. विजय वाणी यांनी आभार मानले. आजच्या वृक्षारोपणाप्रसंगी रमेश पहेलानी यांच्यासह गायक कलावंतांनी योगदान दिले.
*फोटो कॅप्शन* – मेहरूण तलाव परिसरात एक हजार झाडे लावण्याच्या उपक्रमाचा वृक्षारोपण करून शुभारंभ करताना महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्ह्याचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, ऍड. जमिल देशपांडे, विजय वाणी, डॉ. सविता नंदनवार, संध्या वाणी, निलोफर देशपांडे, सुमित्रा पाटील, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे उदय महाजन, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी अनिल जोशी, अतिन त्यागी व मान्यवर.

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो गटाच्या महिलांना रिक्षा घेण्याकरीता अग्रीम रकमेसाठी आर्थिक सहकार्य

जळगाव दि. २८ (प्रतिनिधी) – ‘गुलाबी रिक्षा चालवून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. कष्टकरी, गोरगरीब महिलांना ऑटो रिक्षा घेण्यासाठी लागणारी अग्रीम रक्कम देऊन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने त्यांचा जीवनमार्ग सोपा केला व त्यांच्या प्रगतीची नवी वाट खुली होणार आहे.’
पिंक ऑटोरिक्षा महिला गटाच्या १५ सदस्यांना रिक्षा घेण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन अग्रीम रक्कमेसाठी आर्थिक सहाय्य केले त्याचा छोटेखानी कार्यक्रम गांधी तीर्थला पार पडला. त्यासाठी सौ. ज्योती जैन, सौ. संध्या वाणी, डॉ. सविता नंदनवार, गीता धरमपाल, सौ. अंबिका जैन आणि मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, निलोफर देशपांडे सचिव विजय वाणी, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
गेल्या तीन वर्षांपूर्वी शहरात महिला, मुलींच्या सुरक्षीत प्रवासासाठी महिला ऑटोचालक असाव्या असा विचार पुढे आला. त्यासाठी पाच महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी शहरात पिंक ऑटो गटाची स्थापना करण्यात आली. १५ महिलांना रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी अतुल शक्ती ऑटोचे संचालक विद्याधर नेमाने यांनी सौजन्य केले. या सर्व महिलांचा जळगाव जनता बँकेत बचत गट असून त्या मार्फत त्यांना रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा घेणाऱ्या त्या महिलांना डाऊन पेमेंट भरण्यासाठी देखील पैसे नाहीत ती अडचण जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना सांगण्यात आली त्यानुसार त्यांनी डाऊन पेमेंटसाठी सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमील देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय वाणी यांनी केले.

फोटो कॅप्शन – सौ. ज्योती जैन, सौ. संध्या वाणी, डॉ. सविता नंदनवार, गीता धरमपाल, सौ. अंबिका जैन आणि मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, निलोफर देशपांडे सचिव विजय वाणी व पिंक ऑटोरिक्षा महिला गटाच्या सदस्या.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version