येत्या 2 दिवसात हे काम करा,अन्यथा 5,000 रुपयांपर्यंत दंड भरण्यास तयार राहा.

जर तुम्ही देय तारखेनंतर म्हणजे 31 जुलै 2022 नंतर आणि 31 डिसेंबर 2022 पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरनार असाल तर 5,000 रुपये दंड भरावा लागेल परंतु जर करदात्याचे वार्षिक करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर दंडनुसार एक हजार रुपये द्यावे लागतील. त्यामुळे तारीख वाढण्याची प्रतीक्षा थांबवा. कारण, टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख वाढवण्याची सध्या कोणतीही योजना नाही, असे केंद्र सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून विविध मंचांद्वारे वारंवार सांगितले जात आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे आणि तो दिवस रविवार आहे. रविवारी बँका बंद असतात. सामान्यतः आता आयकर रिटर्न ऑनलाइन भरले जाते, त्यामुळे बँकेत जाण्याची गरज नाही, परंतु तरीही रविवारी बँक नेटवर्क मेंटेनन्स किंवा नेट बँकिंगमध्ये समस्या आल्याने तुम्हाला दंडाला सामोरे जावे लागू शकते.

असं असलं तरी, यावेळी आयकर विभागाच्या टॅक्स पोर्टलबद्दल खूप तक्रारी आहेत. वास्तविक कर भरण्यासाठी करदात्याला चलन वापरावे लागते. कोणत्याही कारणास्तव ऑनलाइन पेमेंटमध्ये अडचण आल्यास पैसे भरण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागते. याशिवाय टीडीएस प्रमाणपत्रही बँकेकडूनच उपलब्ध आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version