चालू आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावू शकतो. केंद्रीय रिझर्व्ह बँकेनंतर आता जागतिक बँकेनेही जीडीपी वाढीचा अंदाज कमी केला आहे. जागतिक बँकेने (वल्ड बँक) जीडीपी वाढीचा अंदाज 8.7 टक्क्यांवरून 8 टक्के केला आहे.
नुकत्याच झालेल्या चलनविषयक आढावा बैठकीत रिझर्व्ह बँकेने (RBI) जीडीपी वाढीचा अंदाजही कमी केला. चालू आर्थिक वर्षासाठी, आरबीआयने जीडीपी विकास दराचा अंदाज 7.2 टक्के कमी केला आहे. यापूर्वी तो 7.8 टक्के असण्याचा अंदाज होता.
महागाईमुळे ब्रेक :- आरबीआयनंतर जागतिक बँकेनेही महागाईचा उल्लेख केला आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जागतिक बँकेने रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा सेवांमधील समस्या महागाई वाढण्याचे कारण असल्याचे नमूद केले आहे.
इतर देशांसाठी वाढ :- जागतिक बँकेने अफगाणिस्तानसाठी जीडीपी वाढीचा अंदाज देखील कमी केला आहे. आता नवीन अंदाज 6.6 टक्के आहे. जीवाश्म इंधनाची मोठी आयात आणि रशिया-युक्रेनमधील पर्यटकांची घटती आवक यामुळे जागतिक बँकेने मालदीवचा अंदाज 11 टक्क्यांवरून 7.6 टक्क्यांवर आणला. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेसाठी जागतिक बँकेने जीडीपी अंदाज 2.1 टक्क्यांवरून 2.4 टक्के केला आहे.