स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मंगळवारी सांगितले की, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या तात्काळ पेमेंट सेवा (IMPS) व्यवहारांसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. ही तरतूद YONO अॅप वापरणाऱ्यांसाठीही लागू असल्याचे बँकेने म्हटले आहे. तथापि, तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन IMPS केल्यास, तुम्हाला GST सह सेवा शुल्क भरावे लागेल.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत IMPS व्यवहारांची कमाल मर्यादा 2 लाख रुपये होती, ती आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. आतापर्यंत एसबीआय केवळ 2 लाख रुपयांपर्यंतच्या IMPS व्यवहारांवर सेवा शुल्क आकारत नाही.
SBI ने सांगितले की, ग्राहकांमध्ये डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग (YONO अपसह) द्वारे IMPS व्यवहारांवर सेवा शुल्क न आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर बँक शाखांमधून IMPS व्यवहारांसाठी 2 लाख ते 5 लाख रुपयांचा नवा स्लॅब करण्यात आला आहे. या स्लॅब अंतर्गत येणाऱ्या रकमेवर सेवा शुल्क “रु. 20 + GST” असेल. SBI ने सांगितले की, या सूचना 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू होतील.
कृपया लक्षात घ्या की सध्या फक्त बँक शाखांमधून 1,000 रुपयांपर्यंतचे IMPS व्यवहार सेवा शुल्कातून मुक्त आहेत. रु. 1,001 आणि रु. 10,000 पर्यंतच्या व्यवहारांवर रु. 2 + GST लागू होतो. दुसरीकडे, 10,001 रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 4 रुपये + GST लागू आहे. 1 लाख ते 2 लाख रुपये सेवा शुल्क 12 रुपये + GST आहे.