हा शेअर ₹ 9 वरून चक्क ₹3500 च्या पुढे पोहोचला, 1 लाखाचे केले तब्बल 4 करोड रुपये…

एका फार्मा कंपनीच्या शेअर्सने जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जवळपास 40,000 टक्के परतावा दिला आहे. ही कंपनी Divi’s Laboratories आहे. डिविस लॅब ही कंपनी Active Pharmaceuticals Ingredients बनवते. गेल्या काही वर्षांत कंपनीचे शेअर्स 9 रुपयांवरून 3500 रुपयांपर्यंत वाढले आहेत. Divis Labs शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 5,425.10 आहे.

Divis Laboratories Ltd

1 लाखाचे तब्बल 4 करोड रुपये झाले :-

13 मार्च 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये डिविस लॅबोरेटरी चे शेअर्स 9.04 रुपये होते. 25 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 3,590.05 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जवळपास 39,200 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 13 मार्च 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 3.97 कोटी रुपये झाले असते.

10 वर्षात 1 लखाचे 7 लाख रुपये झाले :-

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर 25 मे 2012 रोजी Divis Laboratories चे शेअर्स 474.48 रुपये होते. 25 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 3,590.05 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 7.56 लाख रुपये झाले असते. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 550 टक्के परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 3,540.35 रुपये आहे. BSE वर कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 93,186 कोटी रुपये आहे.

अस्वीकरण :- येथे केवळ शेअर्स ची माहिती दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे आणि कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या .

जॉईन Trading Buzz
Exit mobile version