भारतातील हे लोकप्रिय वाहने आता कायमची बंद होणार ..

ट्रेडिंग बझ – मारुती सुझुकी, फोक्सवॅगन, स्कोडा, निसान आणि रेनॉल्ट सारख्या कार कंपन्यांनी भारतात त्यांची डिझेल वाहने आधीच बंद केली आहेत. आताच्या अहवालानुसार, Honda Cars India लवकरच त्यांची डिझेल वाहने बंद करण्याचा विचार करत आहे.

एका ऑनलाइन मीडियाशी बोलताना, Honda Cars India चे अध्यक्ष आणि CEO, Takuya Tsumura म्हणाले की, कंपनी डिझेल इंजिनबद्दल जास्त विचार करत नाही. बहुतेक कार कंपन्यांनी युरोपियन बाजारपेठेत त्यांच्या डिझेल पॉवरट्रेन बंद केल्या आहेत.

सध्या, होंडाच्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे जे डिझेल पॉवरट्रेनसह येतात. यामध्ये जॅझ प्रीमियम हॅचबॅक, WR-V सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही, अमेझ कॉम्पॅक्ट सेडान आणि सिटी मिड-साइज सेडानचा समावेश आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, कंपनी Jazz, WRV आणि सिटीचे डिझेल प्रकार कायमचे बंद करू शकते. कंपनी आपले विक्री नेटवर्क अपग्रेड करण्यावर तसेच SUV मॉडेल लाइनअपचा विस्तार करण्यावर काम करत आहे.

Honda ने पुष्टी केली आहे की भारतासाठी तिच्या आगामी नवीन SUV ने विकासाचा टप्पा पूर्ण केला आहे आणि लवकरच उत्पादन सुरू होईल. ही मध्यम आकाराची SUV असण्याची शक्यता आहे जी Hyundai Creta, Kia Seltos, नवीन Toyota Hyryder आणि आगामी मारुती ग्रँड विटारा यांच्याशी टक्कर देईल.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version