LIC IPO बाबत काँग्रेसने सरकारवर साधला निशाणा, नक्की काय म्हणाले ?

LIC चा IPO आजपासून लोकांसाठी खुला होणार आहे. याआधी काँग्रेसने सरकारवर एलआयसीच्या किंमतीला कमी लेखल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, एलआयसीचे खरे मूल्य हे सरकारने सांगितलेल्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त आहे. यापूर्वीही काँग्रेस निर्गुंतवणुकीबाबत केंद्रावर हल्लाबोल करत आहे.

सरकारवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले की, देशातील सर्वात मोठी कंपनी, ज्यामध्ये 30 कोटी देशवासीयांचा वाटा आहे, अशा कंपनीचे मूल्य त्याच्यापेक्षा कमी आहे. ही कंपनी 1 सप्टेंबर 1956 रोजी स्थापन झाली. ते म्हणाले की, जेव्हा लोक अक्षय तृतीयेला नवीन व्यवसाय सुरू करतात, तेव्हा मोदीजी देशातील एका मोठ्या कंपनीतील हिस्सेदारी विकत असतात. एलआयसीचे शेअर्स कमी किमतीत (अंडर व्हॅल्यू) विकले जात असल्याचेही अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

LIC शेअर्सना अँकर गुंतवणूकदारांचा बम्पर प्रतिसाद
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) समभागांना अँकर गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकार्‍यांनी सांगितले की, अँकर गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेले 5,620 कोटी रुपयांचे शेअर्स पूर्णपणे सबस्क्राइब झाले आहेत.

माहितीनुसार, नॉर्वेजियन वेल्थ फंड नॉर्जेस बँक इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आणि सिंगापूर सार्वभौम संपत्ती फंड GIC यासह इतर अँकर गुंतवणूकदारांना 4 मे रोजी IPO उघडण्यापूर्वी शेअर्सचे वाटप करण्यात आले आहे.

21,000 कोटी रुपये उभारणार
केंद्र सरकार LIC मधील 3.5% स्टेक विकत आहे. सरकारला IPO मधून 21,000 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे. IPO अंतर्गत, सरकार कंपनीतील आपले 22.13 कोटी शेअर्स विकत आहे आणि किंमत श्रेणी 902 ते 949 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version