भारतातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी NTPC लिमिटेडने अदानी एंटरप्रायझेसला कोळसा आयातीसाठी अनेक कंत्राटे दिली आहेत. हा करार 6,585 कोटी रुपयांचा आहे. या अंतर्गत गौतम अदानी गृपची कंपनी NTPC साठी 6.25 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे.
NTPC ने 6 निविदा काढल्या :-
NTPC ने सहा वेगवेगळ्या निविदा काढल्या होत्या, त्यात अहमदाबादस्थित आदि ट्रेडलिंक, चेन्नईस्थित चेट्टीनाड लॉजिस्टिक आणि दिल्लीस्थित मोहित मिनरल्स लिमिटेड तसेच अदानी एंटरप्रायझेस यांनी कंपनीच्या निविदांसाठी बोली लावली होती. आज अदानी एंटरप्रायझेसने ही बोली जिंकली आहे.
अदानी एंटरप्रायझेसने एनटीपीसीकडून बोली जिंकण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्च महिन्याच्या सुरुवातीला, जेव्हा कोळशाचे संकट सुरू झाले, तेव्हा NTPC ने 5.75 MT कोळशाच्या आयातीसाठी पाच ट्रेंड जारी केले होते आणि अदानी एंटरप्रायझेसने सर्व बोली जिंकल्या होत्या. त्याची रक्कम 8,422 कोटी रुपये होती.
एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते की, आयात केलेला कोळसा इंडोनेशियातून येईल आणि एनटीपीसी ऑस्ट्रेलियातून आयात करण्याचा विचार करत नाही.
अदानी ग्रुपची कंपनी आस्ट्रेलियामध्ये कारमाइकल कोळसा खाण चालवते. या कोळसा खाणीची क्षमता प्रतिवर्ष 10 मेट्रिक टन इतकी आहे.