टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर, लवकरच अदानी बिल गेट्सला मागे टाकतील का ?

मुकेश अंबानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत, तर गौतम अदानी आता बिलगेट्सला मागे टाकण्याच्या जवळ आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, संपत्तीत घट झाल्यामुळे भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. त्यांची एकूण संपत्ती आता 86.1 अब्ज डॉलरवर आली आहे, तर भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत गौतम अदानी यांनी पाचव्या स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे.

गौतम अदानी आता 110 अब्ज डॉलरसह पाचव्या स्थानावर आहेत. लॅरी पेज 103 अब्ज डॉलर्ससह 6व्या, गुगलचे सर्जे ब्रिन 99.2 अब्ज डॉलर्ससह 7व्या, वॉरेन बफेट 96.5 अब्ज डॉलर्ससह 8व्या आणि मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर 90 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह 9व्या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन 87 अब्ज डॉलर्ससह दहाव्या स्थानावर आहे. मुकेश अंबानी $86.1 अब्ज संपत्तीसह 11व्या क्रमांकावर आहेत.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version