जागतिक बाजारातून मिळालेल्या संकेतांदरम्यान शेअर बाजाराची स्थिती खराब होती.अश्या स्थितीतही काही शेअर जबरदस्त परतावा देत आहेत. असाच एक शेअर अस्ट्रल लिमिटेड ही कंपनी प्लास्टिक उत्पादने बनवते. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.
या कंपनीचे शेअर्स अवघ्या काही वर्षांत 2 रुपयांवरून 1700 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या काळात गुंतवणूकदारांना चक्क 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2,524.95 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1,609.75 रुपये होती.
1 लाख रुपयांचे झाले 8.8 कोटी रुपये :-
13 मार्च 2009 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर Astral Limited चे शेअर्स रु. 1.98 च्या पातळीवर व्यवहार करत होते, तर 3 जून 2022 रोजी NSE वर कंपनीचे शेअर्स रु. 1746 वर बंद झाले. म्हणजेच कंपनीच्या शेअरने त्याच्या गुंतवणूकदारांना 70,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने 13 मार्च 2009 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ती गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या च्या घडीला हे पैसे चक्क 8.81 कोटी रुपये झाले असते.
Astral Limited च्या शेअर्सनी गुंवणूकदारांना गेल्या 5 वर्षात 350 टक्क्यांहून जास्त परतावा दिला आहे. पण यावर्षी कंपनीचा परतावा फारसा चांगला नसून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सनी 25 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
अस्वीकरण :- येथे केवळ शेअर्स ची माहिती दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही . शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे आणि कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य तज्ञांचा सल्ला घ्या .