जळगाव, दि. १६ (प्रतिनिधी) – अनुभूती स्कूल, जळगांव येथे दि. १६ जुलै २०२४ मंगळवार रोजी दींडीसह आषाढी एकादशी आनंदात साजरी करण्यात आली. एकादशीच्या आदल्या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन जयश्री कासार, भावना शिंदे, योगिता सुर्वे, हर्षा वाणी यांनी केले होते. यात विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी ‘चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी’ या सुंदर भजनाचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्यही सादर केले.
यानंतर शालेय परिसरात विठूनामाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. या भक्तीमय वातावरणात सर्व विद्यार्थ्यांनी पाऊलीवर ताल धरत दिंडीत सहभाग घेतला. मैदानावर रिंगण सोहळा रंगला. ‘विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला’ या जयघोषाने कार्यक्रम उत्साहात पार पडला. यासाठी अरविंद बडगुजर, ज्ञानेश्वर सोनवणे सर व भुषण खैरनार सर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांनी मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमात सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला होता.
जळगाव दि.7 प्रतिनिधी – अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत यासह सांस्कृतिक कार्यक्रमांनी अनुभूती निवासी स्कूलच्या स्थापना दिनानिमित्त ‘फेशर्स डे’ साजरा केला. अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी एकमेकांमधील निर्भरता वाढावी, आंत्रपिनर्स निर्माण व्हावे यादृष्टीने अनुभूती निवासी स्कूल ही अनुभवाधारीत शिक्षण देणारी सीआयसीएसई या पॅटर्नची कान्हदेशातील एकमेव स्कूल सुरू केली. अनुभूती स्कूलशी जुळवून घेत आपल्यातील कलागुणांना आत्मविश्वासपूर्वक सादर केले. नवनिर्मिती, उत्कृष्टतेसाठी, स्वागतार्ह काय याची समज होऊन नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. भारतीय संस्कृतीत विविधता आहे. भाषा, पंथ, संस्कृती, सांस्कृतिक वारसा यातून भारतीय मूल्यशिक्षणाचे दर्शन विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातुन झाले.
सतरा वर्षापासून सुरु असलेल्या स्कूलच्या स्थापना दिनाच्या औचित्याने ‘फ्रेशर्स डे ’ ची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, कांताई नेत्रालयाच्या डॉ. भावना जैन, प्राचार्य देबासिस दास यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘भिती ही यशाची पहिली पायरी बनविली पाहिजे कारण भितीमुळे आपण चांगले करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जे हवे आहे ते मिळेलच असे नाही त्यामुळे क्रोध करून काहीही फायदा नाही. स्विकार करणे शिकले पाहिजे. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याचा विचार करू नये यातूनच स्पर्धेच्या युगात यशस्वी होऊ शकतो.’
सुरवातीला स्वागत गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. ‘छमक छमक घुमर घुमर’ … या गीतावर राजस्थानचे पारंपारिक नृत्यातून संस्कृतीचे दर्शन घडविले. उडिसाचे कांचीविजय नाट्य सादर झाले. यात राजा पुरूषोत्तम देव यांच्या संघर्षाची कहाणी विद्यार्थ्यांनी उलगडुन दाखविली. युध्दानंतरच्या परिणामांची परिस्थितीही दाखविली. माणिक यांच्याकडून प्रभू जगन्नाथाने प्यायलेले पाणी, राजकुमारी पद्मावतीचा विवाहाचा प्रसंग हूबेहूब सादर केले. ‘जय जगन्नाथ हमे रहने अपने चरनो मे हे भजन’,
‘सर देशा तू जननी भारत देशा’ हे देशभक्तीपर गीत, अनूभुतीचे विस दिवस यावर अथर्व कांबळे याने व्यक्त केलेले मनोगत, तामिळनाळुचे त्रिवृदा नृत्य, रामायणातील विश्वामित्रा, गुरू वशिष्ट यांची श्रीराम लक्ष्मण यांची भेट हा क्षण, भगवान श्रीकृष्णाच्या गीतावर नृत्य सादर केले. मेरी चौकट मे… राम भजन, मिमिक्री, मेरी माँ.. तेरे जैसा यार कहॉ.. हे गीत गायन, तबला वादन, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत भाषण अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलीत. मणिपूरच्या पारंपरिक नृत्याने ‘फेशर्स डे’चा समारोप झाला. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम् झाले.
दरवर्षी स्कूलचा स्थापना दिन व फेशर्स डे साजरा केला जातो. यादिवशी स्कूलमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना अनुभूती स्कूलची शैक्षणिक जीवनमूल्यांची ओळख झालेली असते. अनुभूती स्कूल निवासी असल्याने विद्यार्थी येथील वातावरणाशी एकरूप होतात. हा आनंदोत्सव म्हणजे फेशर्स डे यात विद्यार्थ्यांनी धम्माल केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन क्रीश संघवी, वर्धनी अग्रवाल यांनी केले.
जळगाव, दि.२७ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन संचलीत अनुभूती इंग्लिश मिडिअम स्कूलचा इयत्ता १० वीचा यंदाही १०० टक्के निकाल लागला. यात कु. धनश्री दत्तात्रय जिरेमाळी-प्रथम (९५.४०%), चि. मुकूंद सदाशिव चौधरी – द्वितीय (९५.००%) व कु. अश्विनी समाधान हरसोडे-तृतीय (९३.८० %), चि. आयूष दीपक जैन – चतुर्थ (९३.४०), कु. पायल सचिन सोनवणे – पाचवा (९२.००) उत्तीर्ण झालेत.
गुणवत्ताधारक उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी अभिनंदन केले. सर्व विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेत. २७ विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी ९० टक्केच्यावर, १८ विद्यार्थी ८० टक्केच्यावर तर तीन विद्यार्थ्यांनी ७५ च्यावर गुणप्राप्त केले.
“अभ्यासाप्रती निष्ठा, सातत्याने केलेला अभ्यास यातून शंभर टक्के यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम ठेवली. परिस्थीती कशीही असो मात्र दूरदृष्टी महत्त्वाची आहे आणि हि अनुभूतीच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्या यशाचे विशेष कौतूक आहे.” अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी व्यक्त केली.
शिवणकाम करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीचे यश – शाळेत प्रथम आलेली कु. धनश्री हिचे वडील जैन फार्मफ्रेश फूड्स लिच्या ओनियन विभागात काम करतात तसेच शिवणकामासाठी हातभार लावतात तर आई पुर्णवेळ शिवणकाम करून घराचा उदर निर्वाहासाठी मदत करतात. “भवरलालजी जैन यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या स्कूलमध्ये मुलगी संस्कारीत होत असून कन्येने मिळविलेल्या यशामुळे आम्ही सर्व आनंदात आहोत”, अशी प्रतिक्रिया तिच्या आई-वडिलांनी नोंदविली.
एकलपालक असलेल्या मुकूंदचे यश – स्कूलमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मुकूंद चौधरी याची आई एकलपालक असून जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चरमध्ये काम करुन त्या आपल्या आई-वडीलांसह मुलांची जबाबदारी सांभाळतात. कटलरी साहित्य विक्री करणाऱ्या पित्याची मुलगी अश्विनी – रेल्वेमध्ये खेळणे विकणे व दारोदार कटलरीचे साहित्य विक्री करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी अश्विनीचा तृतीय क्रमांक आला आहे. प्रतिकूल परिस्थितीत आयुष आणि पायलचे यश – आयुष जैन ह्याचे वडील दाणाबाजारात अगरबत्ती विक्री करतात तर आई शिवणकाम करते. पायल सोनवणेच्या वडीलांचा हरिविठ्ठलनगरमध्ये पानटपरीचा व्यवसाय आहे. एकूणच सर्व विद्यार्थी हे प्रतिकूल परिस्थिती असताना, आई-वडील मेहनत करुन उदरनिर्वाह करुन या सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी पाठबळ दिल्याने ते घवघवीत यश संपादन करु शकले.
जळगाव : जैन इरिगेशनच्या जैन हिल्स, जैन एनर्जी पार्क, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क बांभोरी, जैन टिश्युकल्चर पार्क टाकरखेडा त्याच प्रमाणे अनुभूती निवासी स्कूल, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून त्या त्या लोकेशनवर योग मार्गदर्शकांनी कोरोनाचे नियम पाळत योग अभ्यास करून घेतला. योग दिनाचे महत्त्व समजून घेत नियमित योग करून निरामय आरोग्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.
जैन प्लास्टीक पार्क व टिश्युकल्चर पार्क : ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन आणि दोन प्राणायम हे योग करून प्रत्येक व्यक्ती निरामय जीवन जगू शकतो असा आत्मविश्वास योगसाधक सुभाष जाखेटे यांनी व्यक्त केला. जैन प्लास्टिक पार्क व टाकरखेडा येथे त्यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर बोरसे यांनी केले. प्लास्टिक पार्कचे सुमारे ६०० हून अधिक सहकारी, टिश्युकल्चर पार्क येथील महिला सहकाऱ्यांनी देखील यात हिरीरीने सहभाग घेतला होता.
जैन फूड पार्क येथे योगसाधना शिबिर : जैन व्हॅली येथे जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, जैन अॅग्री पार्क, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सुमारे १००० सहकाऱ्यांनी जैन व्हॅली येथील मसाला प्रक्रिया प्लांट जवळ योगसाधना केली. योग प्रशिक्षक सौ. ज्योती पटेल यांनी योग प्रशिक्षण दिले. ऑक्सीजनची पातळी वाढविण्यासाठी ताडासन करून घेतले. श्वसन शक्ती वाढविण्यासाठी चंद्र व सूर्य नासिका पित्त, मयूरासन, अर्धमयूरासन, प्राणायम, सुर्यनमस्कार केले. पचनशक्तीसाठी पार्श्वोस्तासन, हात व खांद्यासाठी कुक्कुटासन, शरीर लवचिक होण्यासाठी आंजनेयासन, कंबर व पाठीसाठी भुजंगासन शलभासन, तणाव कमी करण्यासाठी अर्धचक्रासन, त्रिकोणासन, गरूडासन करून घेतले. तत्पूर्वी त्यांनी योगदिनाचे शास्त्रीय व अध्यात्मिक महत्त्व ज्योती पटेल यांनी समजून सांगितले. जैन टिश्यूकल्चर पार्कच्या वरिष्ठ सहकारी सौ. अनिता यादव यांच्याहस्ते सूतीहार देऊन ज्योती पटेल यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ सहकारी डॉ. व्ही. आर. सुब्रम्हण्यम, डॉ. प्रमोद करोले, बालाजी हाके, अरविंद कडू, रोशन शहा, संजय पारख, असलम देशपांडे, उदय महाजन, नितीन चोपडा यांसह इतर सहकाऱ्यांची उपस्थिती होती तसेच या कार्यक्रमासाठी मानव संसाधन व कार्मिक विभागाच्या जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, रवि कमोद, आर. डी. पाटील, भिकेश जोशी व इतर सहकारी यांचे सहकार्य लाभले तसेच ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.
अनुभूती निवासी स्कूल व अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल : अनुभूती इंटरनॅशन निवासी स्कूल येथे इयत्ता 5 वी ते 12 च्या संपूर्ण विद्यार्थ्यांसह शिक्षक शिक्षकतेर कर्मचाऱ्यांनी योगसाधना केली. योगशिक्षीका डॉ. स्नेहल पाटील यांनी विविध योगासने करून घेतली. योग एक जीवनशैली यावर मार्गदर्शनही डॉ. स्नेहल पाटील यांनी केले. अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनानुसार योगदिन साजरा करण्यात आला. अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये देखील योग दिवस साजरा झाला.