केमिकल उद्योगात या कंपनीचा IPO खुला: गुंतवणुकीची संधी!

IPO: केमिकल उद्योगातील मोठे नाव असलेल्या एका कंपनीचा IPO खुला झाला आहे. या क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी संधी..

ठळक मुद्दे:
●एका शेअर्स ची किंमत किती असेल!
●यात गुंवणुकीची संधी!
●क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजि लिमिटेड चा IPO खुला!

मुंबई:शेअर बाजार मध्ये गती
कायम आहे ,मुंबई शेअर बाजारात तेजी कायम असल्या मुळे निर्देशांकाने ५३ हजार इतका अंकाणे वाढला असून, निफ्टी मध्ये ही मजल दर मजल सुरु आहे. त्यातच नवनवीन IPO बाजारामध्ये येत आहेत त्यामुळे गुंतवणूक दारांना मोठंमोठ्या संधी प्राप्त होत आहेत. त्यातच केमिकल उद्योगामध्ये नवीन IPO खुला झाल्यामुळे गुंतवणूक दारांसाठी संधी चालून आलेली आहे. केमिकल उद्योगक्षेत्रातील मोठे नाव असलेल्या कंपनीचा IPO खुला झाला आहे
(Clean Science And Technology IPO open)
स्पेसिअल केमिकल्स उत्पादित करणारी कंपनी म्हणजेच “क्लीन सायन्स अँड टेक्नोलॉजी लिमिटेड” या केमिकल कंपनीचा IPO ७ जुलै २०२१ रोजी खुला झाला आहे. यात ९ जुलैपर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार आहे. फार्मा,परफॉर्मन्स केमिकल्स, FMGC व इंटरमीडिएट्स कंपन्यांसाठी लागणारी केमिकल्स अशा कामाच्या दृष्टीने महत्त्वाची स्पेश्यालिटी केमिकल्स उत्पादित करण्याचे काम ही कंपनी करते.

एका शेअरची किंमत किती असेल?

या कंपनीच्या प्रति एका शेअरची किंमत ८८० ते ९०० या दरम्यान आहे. किमान १६ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर १६ च्या लाईनीतल्या संख्येइतक्या इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येनार आहे. या योजनेत शेवटची तारीख ९ जुलैपर्यंत गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार आहे. या IPO मधून १५,४६६.२२ दशलक्ष रुपयांपर्यंत किंमतीच्या समभागांची विक्री करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version