ट्रेडिंग बझ :- तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणजेच SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने मोबाईल फंड ट्रान्सफरवरील एसएमएस शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. SBI ने माहिती दिली की USSD सेवा वापरून ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहज व्यवहार करू शकतात.
SBI काय म्हणाली ? :-
SBI ने ट्विट केले की, “मोबाईल फंड ट्रान्सफरवरील SMS शुल्क आता माफ झाले! ग्राहक आता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहज व्यवहार करू शकतात.” यात पुढे असेही म्हटले आहे की ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सेवांचा लाभ घेऊ शकतात, ज्यात पैसे पाठवणे, पैसे मागणे, खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि UPI पिन यांचा समावेश आहे.
यूएसएसडी म्हणजे काय ? :-
यूएसएसडी किंवा अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा सामान्यतः टॉक टाइम शिल्लक किंवा खात्याची माहिती तपासण्यासाठी आणि मोबाइल बँकिंग व्यवहारांसाठी वापरला जातो. ही सेवा फीचर फोनवर काम करते. फीचर फोन असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. देशातील 1 अब्जाहून अधिक मोबाईल फोन वापरकर्त्यांपैकी 65% पेक्षा जास्त फीचर फोन ग्राहक आहेत.