रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाच्या घोषणेनंतर शेअर बाजारात सकाळी 10:40 च्या दरम्यात थोडी रिकव्हरी झाली होती सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या चिन्हावर आले होते. सेन्सेक्स 193.55 अंकांच्या वाढीसह 55,300 वर होता
भू-राजकीय संकट आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय यादरम्यान रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने शेअर बाजार तोट्यात बंद झाला. सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला.
BSE चे 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 214.85 अंकांनी म्हणजेच 0.39 टक्क्यांनी घसरून 54,892.49 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी ही 60.10 अंकांनी म्हणजेच 0.37 टक्क्यांनी घसरून 16,356.25 अंकांवर बंद झाला.
कोणत्या शेअर्सची स्थिती काय आहे ? :-
सेन्सेक्स शेअर्सपैकी भारती एअरटेलचा शेअर सर्वाधिक म्हणजेच 3.31 टक्क्यांनी घसरला. आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा यांचेही नुकसान झाले. दुसरीकडे, नफा मिळवणाऱ्यांमध्ये टाटा स्टील, स्टेट बँक ऑफ इंडिया, डॉ. रेड्डीज, बजाज फायनान्स, टीसीएस, टायटन आणि मारुती यांचा समावेश आहे.
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने बुधवारी रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ केली. यामुळे घर, वाहन आणि इतर कर्जाचा मासिक हप्ता म्हणजेच EMI वाढला आहे.
मंगळवारी शेअर बाजाराची स्थिती कशी होती :-
BSE 30 शेअर्सचा सेन्सेक्स मंगळवारी 567.98 अंकांनी म्हणजेच 1.02 टक्क्यांनी घसरून 55,107.34 वर आला. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 2,08,291.75 कोटी रुपयांनी घसरून 2,54,33,013.63 कोटी रुपयांवर आले.
https://tradingbuzz.in/8084/
Comments 2