एचडीएफसी लिमिटेडने शनिवारी सांगितले की, एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्ज लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) समोर अर्ज दाखल करण्यात आला आहे.
हा अर्ज HDFC बँकेच्या त्याच्या मूळ कंपनी हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (HDFC लिमिटेड) मध्ये प्रस्तावित विलीनीकरणाचा भाग आहे.
एचडीएफसीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, एकत्रित कंपनी तयार करण्याच्या योजनेसाठी विविध वैधानिक आणि नियामक संस्था, भागधारक, कर्जदार, एनसीएलटी, स्पर्धा आयोगासह मंजूरी घ्यावी लागेल. या विलीनीकरणासाठी HDFC बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील हे कदाचित सर्वात मोठे विलीनीकरण ठरणार आहे.
एप्रिलमध्ये देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेडने खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेत विलीनीकरणाची घोषणा केली होती. सुमारे 40 अब्ज डॉलरच्या या संपादन करारामुळे वित्तीय सेवा क्षेत्रात मोठी कंपनी निर्माण होईल, असे सांगण्यात आले. प्रस्तावित युनिटची एकत्रित मालमत्ता सुमारे 18 लाख कोटी रुपये असेल.