ऑगस्टच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल झाले. यामध्ये गॅस कंपन्यांनीही आपले नवे दर जाहीर केले आहेत. यावेळी गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत तर घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थेच आहेत. कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 36 रुपयांची कपात केली आहे. यानंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1976 रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी हा 19 किलोचा सिलिंडर 2012 रुपयांना विकला जात होता.
यापूर्वी, गॅस कंपन्यांनी 6 जुलै रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 9 रुपयांनी कपात केली होती. 1 जुलै रोजी व्यावसायिक सिलिंडर 198 रुपयांनी स्वस्त झाला. तीन महिन्यांतील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीतील ही चौथी कपात आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला होता. तेव्हापासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थेच आहेत. राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये गॅस सिलेंडरची किंमत :-
राजधानी दिल्ली 1053 रुपये
लखनौ 1090.5
मुंबई 1053
पटना 1142.5
रांची 1110.5
कोलकाता 1079
भोपाळ रु. 1058.5
चंदीगड 1062.5
जयपूर 1056.5
बंगलोर 1055.5
चेन्नई 1068.5
अहमदाबाद 1160