ट्रेडिंग बझ – जुलै महिना काही दिवसांनी सुरू होत असून नवीन महिन्यासोबत नवे बदल, नवे नियम येतील. दर महिन्याला काही ना काही नवे नियम लागू केले जातात, त्याचा आपल्या खिशावर परिणाम होतो. यात गरजांशी संबंधित अनेक दुरुस्त्या होतात, नवे बदल येतात. यावेळीही काही गोष्टी बदलत आहेत. 1 जुलै 2023 पासून काय बदल होत आहेत ते पाहूया.
फुटवेअर कंपन्यांचे नियम :-
शूज आणि चप्पल यांसारख्या फुटवेअर उत्पादनांचे मोठे आणि मध्यम उत्पादक आणि सर्व आयातदारांना 1 जुलैपासून 24 उत्पादनांसाठी अनिवार्य गुणवत्ता मानकांचे पालन करावे लागेल. गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCO) दर्जेदार पादत्राणे उत्पादनांचे देशांतर्गत उत्पादन सुनिश्चित करेल आणि निकृष्ट उत्पादनांच्या आयातीला देखील प्रतिबंध करेल. सध्या ही गुणवत्ता मानके फक्त मोठ्या आणि मध्यम स्तरावरील उत्पादक आणि आयातदारांसाठी लागू होतील, परंतु 1 जानेवारी 2024 पासून, लहान पादत्राणे उत्पादकांनाही त्यांचे पालन करणे बंधनकारक असेल.
क्रेडिट कार्डवर TCS चे नियम :-
क्रेडीट कार्डद्वारे परदेशात पेमेंट केल्यावर 20% TCS (स्रोतावर जमा केलेला कर) चा नियम लागू होतो. खरेतर, वित्त मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय क्रेडिट कार्डद्वारे होणारा खर्च लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे 20 टक्के TCS लागू होईल. परदेशात क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खर्चावर टीसीएस आकारला जात असल्यास कार्ड जारी करणाऱ्या बँकेला निश्चित कालावधीत योग्य माहिती देण्याची तरतूद आयकर विभाग विचार करत आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख :-
जर तुम्ही अद्याप प्राप्तिकर विवरणपत्र भरले नसेल, तर तुम्हाला संपूर्ण जुलैमध्ये ही संधी मिळेल. 31 जुलै ही ITR दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
LPG, CNG च्या किमतीत होणार बदल :-
1 जुलैपासून गॅस वितरण कंपन्या एलपीजी आणि सीएनजी-पीएनजीच्या दरातही बदल करणार असून, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.