तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘सुकन्या समृद्धी योजना’ (SSY) योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलीचे भविष्य वाचवू शकता. सोप्या भाषेत सांगायचे तर, या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही वयाच्या 21व्या वर्षी लाखो रुपयांचे मालक व्हाल. चला तर या योजने बद्दल जाणून घेऊया..
ही अशी योजना आहे जिथे तुम्ही दरमहा केवळ 250 रुपये जमा करून तुमच्या मुलीचे भविष्य उज्ज्वल करू शकता. या योजनेत तुम्ही किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करू शकता.
या योजनेअंतर्गत, मुलगी 10 वर्षांची झाल्यावर, त्यात पैसे जमा करणे सुरू करा आणि ती 21 वर्षांची झाल्यावर तिला परिपक्वतेची रक्कम मिळेल. अशा प्रकारे तुम्ही कमी पैसे गुंतवून भरपूर पैसे वाचवू शकता.
केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेसह इतर लहान बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही, तर बँक खाती, एफडी आणि पीएफवरील व्याजदरात काहीशी कपात केली आहे.
कोणत्या योजनेवर किती व्याज मिळते :-
सध्या, मुदत ठेवींवर (एफडी) सरासरी 4.5 ते 5.5 टक्के व्याज मिळत आहे, तर NSCला 6.8 टक्के आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीला (पीपीएफ) 7.1 टक्के, तर सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळत आहे. अशा स्थितीत सुकन्या समृद्धी योजना इतर योजनांच्या तुलनेत खूपच चांगली आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कसे उघडावे ? :-
जर तुम्हाला या अंतर्गत तुमचे खाते उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खाते उघडू शकता. खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र सादर करावे लागेल. याशिवाय या योजनेत गुंतवलेल्या पैशावर करात सूटही मिळते.
तुम्हाला याप्रमाणे 15 लाख मिळतील :-
जर तुम्ही या योजनेत दरमहा 3000 रुपये गुंतवलेत, म्हणजेच वार्षिक 36000 रुपये गुंतवल्यानंतर, 14 वर्षांनंतर, तुम्हाला 7.6 टक्के वार्षिक चक्रवाढ दराने 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्षांच्या म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये इतकी असेल.