जळगाव : जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या (दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी) अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलचा इयत्ता 10 वीचा सलग तिसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल लागला. यात विद्यार्थीनीनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. अनुभूती शाळेत यंदा 10 वी साठी एकूण 51 विद्यार्थी होते, त्यातील 50 विद्यार्थी विशेष प्रावीण्य सह गुणवत्ता यादीत आले आहे तर एक विद्यार्थी प्रथम वर्गात ( फर्स्ट क्लास ) आला आहे, या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी पाहिली असता 90% च्यावर गुण मिळविणारे 15, 81 ते 90 टक्के गुण मिळविणारे 34, 74 ते 80 टक्के गुण मिळविणारे 2 विद्यार्थी आहेत. सर्वच वि्दयार्थी उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेले आहेत.
पुर्वा रविंद्रसिंग राजपूत -प्रथम (95.60 %), वैष्णवी भास्कर पवार, निकिता गौतम सोनवणे – द्वितीय (94.00 %), दिव्या विलास बारी- तृतीय (93.20 %), राज चंद्रकांत सोनवणे- चतुर्थ (92.60), प्रथमेश शाम वाघ, कु.तेजल दिपक चौधरी- पाचवे (92.20) ठरली. गुणवत्ताधारक उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन तसेच जैन इरिगेशनचे सह-व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी अभिनंदन केले.
इंग्रजी, मराठी, हिंदी, शास्त्र, गणित व सामाजिक शास्त्र या विषयात तर बहुतांश विद्यार्थ्यांनी 100 पैकी 95 च्यावर गुण पटकावले आहेत. शास्त्र विषयात राज सोनवणे व पुर्वा राजपूत 98 गुण, गणित विषयात वैष्णवी पवार 95 गुण, मराठी विषयात दिशा सपकाळे 94 गुण, हिंदीमध्ये पुर्वा 93 गुण तर इंग्रजी विषयात कु. क्रिष्णा भानुदास चव्हाण 93 गुण मिळविले आहेत.
कोविड नंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष परिक्षा व घरची हलाखीची परिस्थिती अशा आव्हानात्मक स्थितीत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश खूप दैदिप्यमान आहे, त्यांच्या या यशात अनुभूती स्कूलमधील शिक्षक आणि शिक्षकेतर वृंदाचा मोलाचा सहभाग आहेच, सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल हे त्याचे फलित आहे, अशी प्रतिक्रिया भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली. शाळेत प्रथम आलेली पुर्वा राजपूत हिचे वडिल खासगी कंपनीत आहेत. दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली वैष्णवीचे वडिल कारपेंटर तर निकिताचे वडिल पेंटर आणि आई धुणीभांडी काम करतात.
तृतीय आलेल्या दिव्या बारीची आई साफसफाई करतात. चतुर्थ आलेल्या राज सोनवणेचे वडिल शेतकरी आहेत तर पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्रथमेशचे वडील लॉड्री तर आई धुणीभांडी करतात. त्याच्यासोबत उत्तीर्ण झालेली कु. तेजल चौधरीची आई खासगी शिकवणी घेतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मिळवलेल्या या यशामुळे सर्वांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. समाजसेवा हा संस्कार आदरणीय भवरलालजी जैन यांच्या विचारांमधून घेतल्याचे सांगत अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील दिशा निश्चित करताना डॉक्टर, आयपीएस, आयएएस, आयटी इंजिनीअर तर इंडियन नेव्हीमध्ये देशसेवा करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.
अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क
जळगाव दि.२० (प्रतिनिधी) - जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या...