पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सरकार इथेनॉलच्या मिश्रणावर भर देत आहे. 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोल-डिझेल 20% इथेनॉल मिश्रणासह निवडक पेट्रोल पंपांवर उपलब्ध होईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीही कमी होतील.
तेलासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबित्व :-
केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की, भारत मोठ्या प्रमाणावर पेट्रोल-डिझेलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून आहे. ते म्हणाले, जोपर्यंत देशांतर्गत उत्पादन वाढत नाही, तोपर्यंत तेलाच्या किमती नियंत्रित ठेवता येणार नाहीत.
83 टक्के तेल आपण बाहेरून आणतो :-
राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, जैस, अमेठी येथे कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करताना तेली म्हणाले, “देशातील 83 टक्के तेल आम्ही बाहेरून आणतो. आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून आहोत. जोपर्यंत आपले उत्पादन वाढत नाही तोपर्यंत तेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवता येणार नाही.
सरकार अवलंबित्व कमी करण्यासाठी काम करत आहे :-
ते पूढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या की पेट्रोलियम कंपन्या तेलाच्या किमती वाढवतात. आंतरराष्ट्रीय बाजारावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार या दिशेने काम करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे, त्याशिवाय नवीन पद्धती अवलंबल्या जात आहेत.
नवीन ठिकाणी तेल शोधण्याचे प्रयत्न :-
देशात नवनवीन तेलाचे ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राज्यमंत्री म्हणाले. मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्ये आहेत पण तिथेही तेलाचा शोध लागेल.
Comments 1