सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने विविध मुदतींच्या मुदत ठेवींवरील व्याजदर एक चतुर्थांश टक्क्यांपर्यंत (0.25%) वाढवले आहेत. कॅनरा बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की सुधारित दर 1 मार्च 2022 पासून लागू आहेत. बँकेने पुढे सांगितले की, एक वर्षाच्या मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर 5.1 टक्के करण्यात आलेला आहे, तर एक ते दोन वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर व्याज दर 5 टक्क्यांवरून 5.15 टक्के करण्यात आला आहे.
2-3 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 5.20 टक्के आणि 3-5 वर्षांच्या ठेवींवरील व्याजदर 5.25 टक्क्यांवरून 5.45 टक्के करण्यात आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 5-10 वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर कमाल 0.25 टक्के वाढवून 5.5 टक्के करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
कॅनरा बँकेत 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीसाठी व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना सर्व मुदत ठेवींवर 0.50 टक्के किंवा अर्धा टक्के अधिक व्याज मिळेल. बँकेच्या नवीन व्याजदरांचा फायदा नवीन एफडी मिळवणे आणि जुन्या एफडीचे नूतनीकरण यावर मिळेल. यापूर्वी बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड, आयडीबीआय बँक इत्यादींनीही वेगवेगळ्या मुदतींच्या मुदत ठेवींसाठी व्याजदर वाढवले आहेत.