मुंबई : अमेरिकेच्या पतधोरणात आज व्याज दरवाढीचे संकेत मिळाले. त्यामुळे कालपासून जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वारे वाहू लागले. आज देखील जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले आहेत. भारतीय शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या मोठ्या प्रमाणात लाटा उसळल्या. तरीदेखील शेअर निर्देशांक खालच्या पातळीवर स्थिरावला आहे.
बाजार बंद होत असतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समधे 21 अंकांची वाढ होत ती 52,344 अंकांवर बंद झाली. त्यासोबतच विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आठ अंकांनी कमी होऊन 15,683 अंकांवर बंद झाला.
औषधे आणि ग्राहक वस्तू क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांची हानी झाली. त्यामधे धातु, सरकारी बॅंका, रिअॅलिटी क्षेत्राचा अंतर्भाव होता. गेल्या काही दिवसांमध्ये मिड कॅपमधील कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाली. त्यामुळे निर्देशांक वाढले होते. आज या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तसेच निर्देशांक कमी पातळीवर गेले.
अमेरिकेच्या पतधोरणाचा परिणाम झाल्याने युरोप, अमेरिका आणि आशिया खंडातील शेअर बाजाराचा निर्देशांक मागे राहिला. या परिस्थितीत भारतीय निर्देशांक स्थिर आहेत. भारताच्या दृष्टीने चांगली बाजू म्हटली तर भारतातील बहुतांश भागातील लॉकडाउन उघडले आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील वेगाने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येत आहे.
सलग तिसऱ्या आठवड्यातही भारतीय शेअर बाजारात तेजी कायम
2 मे रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात सकारात्मक तेजी दिसून आली. सलग तिसऱ्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक...