भारतीय रिझर्व्ह बँकेने बँक लॉकरसंदर्भात आपल्या नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीनतम मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आता लॉकरसंदर्भात बँकेचे दायित्व मर्यादित केले गेले आहे.
ग्राहक त्याच्या लॉकरसाठी एका वर्षात जास्तीत जास्त भाडे देईल ते बँकेच्या दायित्वाच्या 100 पट असेल.
उदाहरणार्थ, तुम्ही एका बँकेत लॉकर घेतले ज्याचे वार्षिक भाडे शुल्क 1000 रुपये आहे. जर त्या बँकेच्या शाखेत आग, चोरी किंवा दरोडा पडला किंवा ती इमारत कोसळली तर बँक तुम्हाला जास्तीत जास्त 1 लाख रुपये (1000 × 100 = 100000) परत करू शकते. हे देखील लक्षात ठेवा की एखाद्या बँक कर्मचाऱ्याने फसवणूक केली तरी त्या स्थितीत देखील बँकेचे दायित्व 100 पट असेल. लॉकर्स संबंधी नवीन मार्गदर्शक सूचना 1 जानेवारी 2022 पासून लागू केली जाईल.