ट्रेडिंग बझ – टाटा गृप ची दिग्गज टाटा मोटर्सच्या शेअर्सची न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) मधून डी-लिस्टिंग झाली आहे. टाटा मोटर्सने सांगितले की ते न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमधून त्यांचे सामान्य शेअर्स स्वेच्छेने डी-लिस्ट करत आहेत. स्टॉक एक्सचेंजमधून स्टॉक काढून टाकण्याच्या प्रक्रियेला डी-लिस्टिंग म्हणतात. यानंतर शेअर्सची खरेदी-विक्री करता येत नाही. तथापि, ज्या गुंतवणूकदारांकडे आधीपासून शेअर्स आहेत त्यांना विक्री करण्याची संधी मिळते.
काय कारण आहे :-
टाटा मोटर्सने एका नियामक सूचनेमध्ये म्हटले आहे की, भारतीय कायद्यांतर्गत नियामक निर्बंध लादल्यामुळे, अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट्स (ADS) चे व्यवहार यूएस मार्केटमध्ये केले जाणार नाहीत. टाटा मोटर्सने सांगितले की, एडीएस धारक त्यांचे शेअर्स न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये डिपॉझिटरीमध्ये जमा करू शकतात. हे काम 24 जुलै 2023 पर्यंत करावे लागणार आहे. निर्दिष्ट वेळेनंतर, डिपॉझिटरी उर्वरित इक्विटी शेअर्स विकू शकते.
याचा भारतीय बाजारावर परिणाम होईल का ? :-
टाटा मोटर्सने सांगितले की, या निर्णयाचा भारतातील बीएसई किंवा एनएसईवरील त्यांच्या इक्विटी शेअर्सच्या व्यापारावर किंवा सध्याच्या सूचीबद्ध स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही. मंगळवारी टाटा मोटर्सच्या शेअरच्या किमतीत 3 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 420 रुपयांच्या वर आहे. त्याच वेळी, मार्केट कॅप 1 लाख 40 हजार कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.