ट्रेडिंग बझ – गौतम अदानी यांच्या कंपनीने आणखी एक मोठा करार केला आहे. अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) या अदानी गृपची बंदर कंपनीने इंडियन ऑइलटँकिंग लिमिटेडमधील 49.38 टक्के हिस्सा 1,050 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. इंडियन ऑइलटँकिंग (IOTL) ही लिक्विड स्टोरेज सुविधा विकसित आणि ऑपरेट करणारी कंपनी आहे.
कंपनीने काय म्हटले ? :-
अदानी पोर्ट्सने एका निवेदनात म्हटले आहे की, या डीलमध्ये IoT उत्कल एनर्जी सर्व्हिसेस लि. यामध्ये अतिरिक्त 10 टक्के इक्विटी स्टेकचा समावेश आहे. या उपकंपनीमध्ये IOTL ची 71.57 टक्के हिस्सेदारी आहे. निवेदनानुसार, APSEZने इंडियन ऑइलटँकिंगमध्ये ऑइलटँकिंग GmbH च्या 49.38 टक्के इक्विटी स्टेकच्या अधिग्रहणासाठी करार केला आहे. लिक्विड स्टोरेज सुविधांचा विस्तार आणि संचालन करणारी ही कंपनी देशातील सर्वात मोठी युनिट आहे.
( IOTL ) इंडियन ऑइलटकिंग:-
कंपनीच्या वेबसाइटनुसार, IOTL हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि जर्मनीच्या ऑइलटँकिंग GmbH मधील संयुक्त उपक्रम आहे. निवेदनानुसार, गेल्या 26 वर्षांत, IOTL ने क्रूड आणि तयार पेट्रोलियमच्या साठवणुकीसाठी पाच राज्यांमध्ये सहा टर्मिनल्सचे नेटवर्क तयार केले आहे.