ट्रेडिंग बझ – गेल्या आठवड्यात 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजार भांडवल 2,00,280.75 कोटी रुपयांनी घसरले आहे. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस यांना सर्वाधिक फटका बसला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 952.35 अंकांनी म्हणजेच 1.59 टक्क्यांनी घसरला होता. या काळात रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस आणि एचडीएफसी यांचे बाजार भांडवल मोठ्या प्रमाणात घसरले आहे.
या कंपन्यांचा फायदा झाला :-
दुसरीकडे, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अदानी ट्रान्समिशन आणि बजाज फायनान्सचे शेअर्स वाढले.
गेल्या आठवड्यात TCS चे बाजार भांडवल 76,346.11 कोटी रुपयांनी घसरून 11,00,880.49 कोटी रुपये झाले. इन्फोसिसचे भांडवल 55,831.53 कोटी रुपयांनी घसरून 5,80,312.32 कोटी रुपये झाले तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 46,852.27 कोटी रुपयांनी घसरून 16,90,865.41 कोटी रुपये आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 14,015.31 कोटी रुपयांनी घसरून 5,94,058.91 कोटी रुपयांवर आले.
या नंतर एचडीएफसीचे बाजार भांडवल 4,620.81 कोटी रुपयांनी घसरून 4,36,880.78 कोटी रुपये इतके झाले आणि एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 2,614.72 कोटी रुपयांनी घसरून 8,31,239.46 कोटी रुपये झाले. तर या कालावधीत नफा मिळवणाऱ्यांपैकी अदानी ट्रान्समिशनचे बाजार भांडवल रु. 17,719.6 कोटींनी वाढून रु. 4,56,292.28 कोटी झाले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार भांडवल 7,273.55 कोटी रुपयांनी वाढून 5,01,206.19 कोटी रुपये झाले आहे.
येत्या आठवड्यात शेअर मार्केटची वाटचाल कशी असेल ? तज्ञांनी सांगितली मोठी गोष्ट..