SBI सह देशातील 3 प्रमुख बँकांनी ग्राहकांच्या ठेवींवर म्हणजेच मुदत ठेवींवर व्याज वाढवले आहे. ही वाढ वेगवेगळ्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. बँकेत जमा करून व्याजाद्वारे नफा कमावणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र, कोणत्या बँकेने व्याजदर वाढवला आहे ते जाणून घेऊया.
अक्सिस बँक :-
खासगी क्षेत्रातील अक्सिस बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर व्याजदर वाढवले आहेत. बँकेने ठेवींच्या दरात 0.45 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. बँकेने 17 महिने ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी एफडीच्या व्याजदरात 45 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता नवीन दर 5.60 टक्क्यांवरून 6.05 टक्के करण्यात आले आहेत. हे दर 11 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. यापूर्वी 16 जुलै रोजी बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती.
SBI :-
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याजदरात 15 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. आता सामान्य गुंतवणूकदारांना FD वर 2.90% ते 5.65% दराने व्याज मिळेल. दुसरीकडे, ज्येष्ठ नागरिकांसाठी, 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या ठेवी 3.40% ते 6.45% पर्यंत आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया :-
सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर व्याजदर वाढवले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, बँक आता 2.75% ते 5.55% पर्यंत व्याजदर आकारत आहे. हे 7 दिवसांपासून ते 555 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींसाठी आहे.
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी खतरनाक भविष्यवाणी , जरूर वाचा..