आताच्या धावपळीच्या जगात सर्वात कमी वेळात पैसे कमवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे शेअर बाजार. शेअर बाजारात काही असे शेअर्स आहेत, त्यामुळे फार कमी कालावधीत चांगले रिटर्न मिळू शकतील. जाणून घेवू अशाचं काही शेअरबद्दल. या शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना अधिक फायद होवू शकतो. देशातील सर्वात जुनी म्यूझीक कंपनी सारेगामा इंडियाचे शेअर चांगले रिटर्न्स मिळवून देतात. 2020 मध्ये या शेअरचे मुल्य 429 रुपये असायचे.
पण आता हे शेअर 2 हजार 725 रूपयांवर पोहोचले आहेत. म्हणजे कंपनीच्या शेअरने 535 पट रिटर्न्स दिले आहेत. या एका वर्षाच्या कालावधीत सेन्सेक्सने 51% रिटर्न दिलं आहे. जर तुम्ही 22 जून 2020 मध्ये या शेअरमध्ये 5 लाख रूपये गुंतवले असते तर आज एका वर्षात तुम्हाला त्या पाच लाख रूपयांचे 31.75 लाख रूपये मिळाले असते.
मंगळवारी शेअर बाजाराची सुरूवात मोठ्या तेजीने झाली. परंतु नंतर शेअर बाजार सपाट झाला. आज सेंसेक्सने इतिहासात पहिल्यांदा 53 हजाराचा आकडा पार केला. मंगळवारी शेअर बाजार मोठी झळाळी पाहायला मिळली.
सांगायचं झालं तर, सारेगामा इंडिया कंपनी पूर्वी ग्रामोफोन इंडिया या नावाने ओळखली जात होती. ही कंपनी आर. पी , संजीव गोयंका ग्रुप यांची कंपनी होती. या कंपनीचा बाजार कार्बन ब्लॅक मॅन्यूफैक्चरिंग, रिटेल , मीडिया एंटरटेनमेंट आणि कृषी क्षेत्रामध्ये देखील पसरला आहे.