शेअर मार्केट मधील सर्वात धोकादायक पेनी स्टॉक (10 रुपयांपेक्षा कमी असलेले शेअर्स) एकतर श्रीमंत बनवतात किंवा गरीब बनवतात. गेल्या 15 दिवसांत, जिथे मोठ्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना परताव्याच्या बाबतीत निराश केले आहे, तिथे काही पेनी स्टॉक्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना डबल पैसे करून श्रीमंत केले आहे. या अल्पावधीत काही शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत.
Spacenet Enterprise च्या शेअर्सने गेल्या 15 दिवसात 93.33 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच 15 दिवसांपूर्वी ज्याने एक लाख रुपये गुंतवले होते, त्याचे एक लाख आता 1.93 लाख झाले असतील. 27 जून 2022 पासून हा स्टॉक सातत्याने वाढत आहे. तो 3.15 रुपयांवरून 7.25 रुपयांपर्यंत वाढला आहे. एका आठवड्यात 25 टक्के आणि एका महिन्यात 159 टक्के परतावा दिला आहे. तर, एका वर्षात 225 टक्के एवढा परतावा दिला आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 7.25 रुपये आहे आणि कमी 1.95 रुपये आहे.
Spacenet Enterprises India Limited ही एक स्मॉल कॅप कंपनी आहे जी विविध क्षेत्रात कार्यरत आहे आणि तिचे मार्केट कॅप रु. 384.51 कोटी आहे. 31-03-2022 ला संपलेल्या तिमाहीत, कंपनीने Rs 26.58 कोटी चे एकूण उत्पन्न नोंदवले आहे, जे मागील तिमाहीत Rs 17.20 कोटी च्या एकूण उत्पन्नापेक्षा 54.60% जास्त आहे.
अस्वीकरन :- या ठिकाणी केवळ शेअर्स बद्दल माहिती दिली आहे, शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे तरी कृपया कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी प्रामाणिक तज्ञांचा सल्ला घ्या .
अदानी गृपचा हा शेअर बनला रॉकेट ; आता शेअर 2600 रुपयांवर जाणार !