नवी दिल्ली : संमिश्र जागतिक संकेतांच्या दरम्यान शेअर बाजार सपाट पातळीवर सुरु झाला असून मंगळवारी स्थानिक शेअर बाजारात किंचीत वाढ झाली आहे. बीएसई सेन्सेक्स 53.91 अंकांनी किंवा 0.10 टक्क्यांनी वाढून 52,900.51 वर उघडला आहे. एनएसई निफ्टी 15.00 अंक किंवा 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 15,849.35 वर उघडला आहे.
बीएसई मध्ये अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, इंडसइंड बँक, एलटी, टायटन, कोटक बँक, सन फार्मा, एचडीएफसी, इन्फोसिस, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, बजाज ऑटो या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. यासह दुसरीकडे टेक महिंद्रा, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, एनटीपीसी, डॉ. रेड्डी, एशियन पेंट्स, एम अँड एम आणि आयटीसी या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे देखील दिसून आले आहे.
- ओएनजीसी, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट, श्री सिमेंट, ग्रासिम हे गेनर्सच्या शेअर्समध्ये सामील झाले असून टेक महिंद्रा, टाटा कंझ्युमर, हिंदुस्तान युनिलिव्हर, रिलायन्स आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स मात्र घसरले असल्याचे दिसत आहे.