नुकताच राकेश झुनझुनवाला यांचा 5 जुलै रोजी 62 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. ‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध असलेला झुनझुनवाला एकेकाळी मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. केवळ पाच हजार रुपये घेऊन ते शेअर बाजारात उतरल. वर्मनमध्ये राकेश झुनझुनवाला यांचा देशातील टॉप श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरेन बफे म्हणूनही ओळखले जाते.
कॉलेजच्या काळापासून व्यापार सुरू केला :-
दिग्गज गुंतवणूकदार झुनझुनवाला यांनी कॉलेजमध्ये असताना 1985 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बीएसई सेन्सेक्स दीडशे अंकांच्या आसपास होता. त्यावेळी त्यांनी केवळ 5,000 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. फोर्ब्सच्या मते, राकेश झुनझुनवाला यांची 3 जुलै 2021 पर्यंत एकूण संपत्ती $4.6 अब्ज (रु. 34,387 कोटी) आहे. राकेश झुनझुनवाला यांचा पहिला मोठा विजय टाटा टीच्या शेअर्समधून मिळाला. झुनझुनवाला यांनी टाटा टीचे 5,000 शेअर्स 43 रुपयांना विकत घेतले होते. 1986 मध्ये त्यांना या स्टॉकमधून 5 लाख रुपयांचा नफा झाला होता अवघ्या तीन महिन्यांतच हा शेअर 143 रुपयांपर्यंत वाढला होता.
रेअर एंटरप्राइसेसची स्थापना :-
1987 मध्ये राकेश राधेश्याम झुनझुनवाला यांनी अंधेरीच्या रेखा झुनझुनवाला यांच्याशी लग्न केले. रेखा झुनझुनवाला या देखील शेअर बाजारातील गुंतवणूकदार आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी 2003 मध्ये स्वतःची स्टॉक ट्रेडिंग फर्म रेअर एंटरप्रायजेसची स्थापना केली. त्यांच्या आणि पत्नी रेखा यांच्या नावाच्या पहिल्या दोन अक्षरांवर त्यांनी ही कंपनी ठेवली आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 37 कंपनीचे शेअर्स आहेत :-
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नजर टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्ससह 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीच्या शेवटी 37 शेअर्स आहेत.