सेन्सेक्स आणि निफ्टी आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मंगळवारी वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 776.72 (1.37%) अंकांच्या वाढीसह 57,356.61 वर बंद झाला, तर निफ्टी 246.85 (1.46%) अंकांच्या वाढीसह 17,200.80 वर बंद झाला. पॉवरग्रीड, महिंद्रा, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टायटन यांचे शेअर्स सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढले आहेत.
आज सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह उघडले. सेन्सेक्स 486 अंकांच्या वाढीसह 57,066 वर उघडला, तर निफ्टी 168 अंकांच्या वाढीसह 17,121 वर उघडला. आज सर्वाधिक वाढ ऑटो आणि रियल्टी समभागांमध्ये झाली.
मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही वाढ
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप 200 हून अधिक अंकांनी वधारले. मिडकॅपमध्ये रुची सोया, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट, श्रीराम ट्रान्सपोर्ट, अदानी पॉवर, अशोक लेलँड, टीव्हीएस मोटर्स, निप्पॉन लाइफ, टाटा कंझ्युमर, एयू बँक, लोढा आणि आयआरसीटी हे आघाडीवर होते. तर हनी वेल ऑटोमेशन, जिंदाल स्टील, ग्लँड या कंपन्यांमध्ये घसरण झाली आहे. स्मॉल कॅप्समध्ये महिंद्रा ऑटोमोटिव्ह, डायन प्रो, डीप इंडस्ट्रीज, इंडिया मार्ट आणि सूर्योदय आघाडीवर होते.
रिअॅल्टी आणि ऑटो क्षेत्रात सर्वाधिक वाढ
सर्व 11 निफ्टी निर्देशांक वधारले. यामध्ये रिअल्टी 3% पेक्षा जास्त वाढली. त्यानंतर ऑटो, पीएसयू बँक, मीडिया 2% पेक्षा जास्त वाढीसह होते. दुसरीकडे, मेटल, फार्मा आणि एफएमसीजी 1% वाढले. सोबतच, वित्तीय सेवा, बँका आणि आयटीमध्ये किरकोळ वाढ झाली.