निर्मला सीतारामन म्हणाल्या “मुद्रा योजनेमुळे लहान व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आणि तळागाळात रोजगाराच्या करोडो संधी निर्माण करण्यात मदत झाली आहे. 68 टक्क्यांहून अधिक कर्ज महिलांना वितरित करण्यात आले आहे.”
PM मुद्रा योजना : सात वर्षांपूर्वी सुरू झालेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY), आतापर्यंत 34.42 कोटी लाभार्थ्यांना 18.60 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. या योजनेला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली आहे.
निर्मला सीतारामन म्हणाल्या की मुद्रा योजनेमुळे लहान व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात आणि तळागाळात रोजगाराच्या करोडो संधी निर्माण करण्यात मदत झाली आहे. एक विशेष बाब म्हणजे 68 टक्क्यांहून अधिक कर्ज महिलांना मंजूर करण्यात आले असून 22 टक्के कर्ज नवउद्योजकांना देण्यात आले आहे.
या योजनेंतर्गत लाभ घेणार्या सर्व लोकांचे अभिनंदन करून निर्मला सीतारामन म्हणाल्या, “अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना आतापर्यंत मंजूर झालेल्या 51 टक्के कर्जांसह, ही योजना जमिनीवर सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करते आणि पंतप्रधानांचा सबका साथ सबका विश्वास ही संकल्पना खऱ्या अर्थाने आत्मसात करते.
8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिगर कंपनी आणि बिगरशेती लघु आणि सूक्ष्म युनिट्सना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यासाठी ही योजना सुरू केली होती.