टाटा सन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही सरकारकडून कंपनीचे अधिग्रहण पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. करार पूर्ण होईपर्यंत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही.
सरकारकडून एअर इंडिया विकत घेतल्यानंतर टाटा सन्स नवीन गव्हर्निंग बोर्ड तयार करण्याच्या तयारीत आहे. समूहाने कंपनीच्या सीईओ आणि सीएफओसह सर्व प्रमुख पदांसाठी भरतीची प्रक्रिया वेगवान केली आहे.
टाटा सन्सने म्हटले आहे की ते एअर इंडियाच्या अंतर्गत आणि बाह्य परिचालन समस्यांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रमुख पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करेल. या प्रकरणाशी निगडित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हर्जिन अमेरिका इंक.चे माजी कार्यकारी फ्रेड रीड हे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाच्या शर्यतीत आहेत आणि माजी यूएस बँकर निपुण अग्रवाल मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) पदाच्या शर्यतीत आहेत.
मात्र, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. टाटा सन्सच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही सरकारकडून कंपनीचे अधिग्रहण पूर्ण करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत. करार पूर्ण होईपर्यंत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही. एअर इंडियाला पुन्हा फायदेशीर एअरलाइन बनवण्यासाठी आम्ही जाहिरातीसह सर्व रणनीती वापरू.