मोतीलाल ओसवाल असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने मोतीलाल ओसवाल नासडॅक १०० ईटीएफच्या प्रत्येक युनिटच्या वर्तमान मूल्यात विभाजन करण्याची घोषणा केली आहे, ती घोषणा अशी की १० रुपयांवरून रु.१ पर्यंत केली आहे. एएमसीच्या मते, विभाजनाची अंतिम तारीख व रेकॉर्ड तारीख 1 जून निश्चित करण्यात आली होती.
1 जूनपर्यंत ठेवींच्या नोंदीनुसार या योजनेंतर्गत अनेक युनिटधारकांचे गुंतवणूक केलेली रक्कम मोठया प्रमाणात वाढेल. परंतु, याचा योजनेच्या युनिट धारकांच्या होल्डिंग वर सध्याच्या मूल्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे एएमसीने सांगितले.
“मोतीलाल ओसवाल एएमसी येथे कमी किंमतीत नाविन्यपूर्ण उत्पादनांमध्ये सहज गुंतवणूक करून देण्याचा आमचा कायम प्रयत्न आहे. या विभाजनामुळे मोतीलाल ओसवाल नासडॅक 100 ईटीएफ व्यापार 17 जून 2021 रोजी मार्केट उघडल्यावर 1/10 व्या किंमतीला होईल. यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात आणण्यास यश प्राप्त केले जाईल. ” असे मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अग्रवाल यांनी सांगितले.
“आम्हाला वाटते की विभाजन या ईटीएफमध्ये अधिक किरकोळ सहभागास प्रोत्साहित करेल ज्यामुळे स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करण्यास मदत होईल. विभाजनानंतर गुंतवणूकदार या ईटीएफमध्ये किमान १०० / – इतकी गुंतवणूक करू शकतात. ” मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे पॅसिव्ह फंडचे प्रमुख प्रतीक ओसवाल यांनी सांगितले. “आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आमच्या सर्व गुंतवणूकदारांचे आभार मानण्याची ही संधी आम्हाला मिळत आहे.
16 जून 2021 रोजी मोतीलाल ओसवाल नासडॅक 100 ईटीएफच्या मालमत्ता अंतर्गत 4,000 कोटी रुपयांची मालमत्ता पारंपारिक मालमत्ता म्हणजे आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ”