भारत व आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून असणारे प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांच्यामागे लागलेले ग्रहमान काही केल्या कमी होताना दिसत नाही. या आठवडाभरात अदानी ग्रुपच्या कंपनीचे शेअर सातत्याने उतरत आहे. त्यामुळे अदानी यांच्या संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. फक्त चार दिवसांत त्यांची संपत्ती 1.11 लाख कोटी ने कमी झाली आहे. प्रत्येक सेकंदाला त्यांना सुमारे 32 लाखांचे नुकसान होत आहे.
अदानी ग्रुपच्या विदेशी फंडाचे अकाउंट ‘फ्रिज’ केल्याने कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत असून, त्यामुळे त्यांना सर्वात मोठा झटका असा बसला की, आशियातील श्रीमंतांच्या यादीतील दुसऱ्या क्रमांकावरुनही ते खाली घसरले आहेत. श्रीमंताची यादी असलेल्या ‘फोर्ब्स’च्या अनुसार, जगातील श्रीमंतांच्या यादीतून 15 व्या स्थानावरून ते आता 18 क्रमांकावर फेकले गेले आहेत. हे जर असेच सुरु राहिल्यास, ‘टॉप-20’तून पण ते बाहेर पडण्याची शक्यता आहे. ‘फोर्ब्स’ वेबसाइटनुसार गौतम अदानी यांच्या संपत्तीत गुरुवारी 3.6 बिलियन डॉलरचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांची संपत्ती 62.7 बिलियन डॉलरवर आली. तसेच मागच्या शुक्रवारी त्यांची संपत्ती 77 बिलियन डॉलरहून अधिक होती.
या आठवड्यात सोमवारपासून ते आजपर्यंत 1.11 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एका सेकंदाला अदानी यांचे 32 लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, दुसरीकडे जगात ‘नंबर वन’ स्थान पटकाविण्यासाठी ‘अमेझॉन’चे जेफ बेजोस आणि फ्रान्सचे अरबपती बनार्ड अर्नाल्ट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे जेफ बेजोस यांचे ‘1’नंबरचे स्थान धोक्यात आले आहे