मुंबई : एनएसई अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधे चालू आर्थिक वर्षात जवळपास पन्नास लाखापेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी नोंद केली आहे. एनएसइचे प्रमुख विक्रम लिमये यांच्याकडून सदर माहिती देण्यात आली आहे.
ही आकडेवारी गेल्या आर्थिक वर्षात जोडले गेलेल्या गुंतवणूकदारांच्या जवळपास 62.5 टक्के आहे. सन 2020 – 21 मध्ये बाजारात नोंदणी केलेल्या गुंतवणूकदारांची संख्या सुमारे 80 लाख एवढी होती.
गेल्या काही वर्षापासून डायरेक्ट रिटेल इन्वेस्टर्सची भागीदारी बाजारात चांगली झाली आहे. नवीन गुंतवणूकदरांमध्ये देखील वाढ झाली असून एकूणच बाजारातील टर्नओवरमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदरांच्या भागीदारीत वाढ झाली आहे.
सन 1990 च्या दशकात करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे बाजाराच्या विकासात मोठे योगदान असून सेबीची स्थापना आणि स्टॉक एक्सचेंचचे विमुद्रीकरण होय.
२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव रंगणार जानेवारीमध्ये
जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ७...