गेल्या काही दिवसांत सलग 6 दिवस शेअर बाजारात घसरण झाली, त्यानंतर शुक्रवार आणि सोमवारी वाढ झाली. पण नंतर 2 दिवसांच्या वाढीनंतर, आज 31 ऑक्टोबर रोजी निफ्टी मोठ्या चढउतारांदरम्यान लाल रंगात बंद झाला. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली प्रगती आज ठप्प झाली होती. निफ्टी50 आज 19100 च्या खाली बंद झाला आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 237.72 अंकांनी किंवा 0.37 टक्क्यांनी घसरून 63874.93 वर आणि निफ्टी 61.30 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी घसरून 19079.60 वर बंद झाला. सुमारे 1830 शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्याच वेळी, 1675 समभाग घसरले आहेत. तर 117 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.
M&M, Sun Pharma, Eicher Motors, LTIMindtree आणि ONGC हे आज निफ्टीमध्ये सर्वाधिक घसरले (Top loosers). तर एसबीआय लाइफ इन्शुरन्स, टायटन कंपनी, एचडीएफसी लाईफ, कोटक महिंद्रा बँक आणि एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. क्षेत्रनिहाय, रियल्टी क्षेत्र वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले आहेत. ऑटो, बँक आणि हेल्थकेअर 0.3-0.6 टक्क्यांनी घसरले आहेत. BSE मिडकॅप निर्देशांक 0.3 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, स्मॉल कॅप निर्देशांक सपाट बंद झाला आहे.