जळगाव/मुंबई दि. १६ प्रतिनिधी – जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने राऊट मोबाईल लि.संघावर विजय मिळवित क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कॉर्पोरेट क्रिकेट ट्रॉफी ‘ए’ डिव्हिजन मध्ये रोमांचकारी सामान्यात विजय मिळविला. जैन इरिगेशनचा संघ ‘ए’ डिव्हीजन मध्ये मागील वर्षी टाईम्स शिल्ड स्पर्धेचा विजयी संघ असून कॉरपोरेट स्पर्धा जिंकून जैन इरिगेशनच्या संघाने कॉर्पोरेट क्षेत्रात वेगळा ठसा उमटविला आहे.
मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामान्यात नाणेफेक राऊट मोबाईल लि. ने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या जैन इरिगेशनच्या संघाने निर्धारित २० षटकात सहा फलंदाजांच्या मोबदल्यात २१८ धावांचे लक्ष्य ठेवले. यामध्ये जय बिस्टाने ५४ चेंडूमध्ये ८५ धावा कुठल्यात. यात सहा चौकार व पाच षटकारांचा आतषबाजी होती. त्याला शाश्वत जगताप ने चांगली साथ दिली. दोघांना प्रथम विकेट साठी ८.१ ओव्हर मध्ये ११३ धावांची भागिदारी रचली. त्याला आयुष झिमरने २१ चेंडूमध्ये ४५ धावा करत उत्कृष्ट साथ दिली. आयुष झिमरे ने तीन चौकार व चार षटकार खेचले. २१८ धावांचे लक्ष्य घेतलेल्या राऊंट मोबाईल लि.चा संघ निर्धारित २० षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात २०८ धावा करु शकला. यामध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. संघातील गोलंदाज प्रशांत सोलंकी यांने ३७ धावांच्या मोबादल्यात तीन फलंदाजांना महत्त्वाच्या वेळी बाद केले. जगदीश झोपे यानेसुद्धा ३४ धावांत तीन गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.
तत्पूर्वी सेमिफायनला मुंबई कस्टमने निर्धारित २० षटकांमध्ये केलेल्या २४४ धावांचा यशस्वी पाठलाग करत अवघ्या १८ ओव्हर मध्ये २४७ धावा करत आठ विकेटने विजय मिळविला होता. यामध्ये जय बिस्टा याने नाबाद १३५ रनांची खेळी विक्रमी ठरली. यात शाश्वत जगताप ४४ (२१ चेंडू), साईराज पाटील ३४ (१७ चेंडू), सुरज शिंदे २९ (१२ चेंडू) योगदान होते. तर गोलंदाजीमध्ये जगदीश झोपे व सोहम याने प्रत्येकी एक विकेट घेऊन विजयामध्ये मोलाची साथ दिली.
जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघात शशांक अत्तरदे, शाश्वत जगताप, दर्शन मांगुकिया, जय बिस्टा, साईराज पाटील, सुवेद पारकर, अनंत तांम्वेकर, आयुष झिमरे या खेळाडूंचा सहभाग होता.
जैन इरिगेशनच्या ‘ए’ डिव्हीजन संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, मुंबई क्रिकेट संघाचे संयोजक मयंक पारिख, जैन स्पोर्टस अॅकडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल, अरविंद देशपांडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.