जळगाव, दि. १९ (क्रीडा प्रतिनिधी) – ऑल इंडिया चेस फेडरेशन व एम.सी.ए. च्या मान्यतेने दि. १९ व २० ऑक्टोबर असे दोन दिवसीय ‘सिनीअर नॅशनल आरबीटर सेमीनार’चे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टस अॅकडेमी द्वारा करण्यात आले. या सेमीनारचे उद्घाटन AICF अॅडव्हाइसरी कमीटी मेंबर व एम.सी.ए.चे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी अशोक जैन म्हणाले की, अशा प्रकारच्या सेमीनारचे बुद्धिबळाच्या विकासासाठी, सक्षम व कुशल आरबीटर व कोचेस साठीचे महत्त्व विषद केले. चेस इन स्कूलचे महत्त्व विषद करून आरबीटर व कोचे यांनी सेमीनारचा फायदा घ्यावा व या क्षेत्रातील नवीन गोष्टींचे अपडेट करावे असा मोलाचा सल्ला दिला.
चिफ फॅकल्टी इंटरनॅशनल आरबीटर वसंत बी. एच. व आय.ए. नितीन शेणवी, पुणे यांचे स्वागत आय.ए. प्रवीण ठाकरे व आकाश धनगर यांनी केले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विलास म्हात्रे यांनी अशोक जैन यांचे स्वागत केले. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटका, पश्चिम बंगाल इ. विविध राज्यांमधून एकुण ८० चेस आरबीटर व कोचेस यात सहभागी झालेले आहेत. जळगावमधून नथू सोमवंशी, भरत आमले व आकाश धनगर यांनी सहभाग नोंदवला. या सेमीनारसाठी जैन इरिगेशन प्रायोजकत्व लाभले.
सचीव नंदलाल गादिया यांनी सूत्रसंचलन केले व सर्वांचे आभार मानले. भारतात तरुण व उद्योन्मुख खेळाडूंच्या आशादायी कामगोरी मुळे होणाऱ्या बुद्धीबळ या खेळाचा झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे अशा प्रकारच्या सेमीनारचा आवश्यकता आहे.
बुद्धीबळ आरबीटरची क्षमता व कौशल्य वाढवणे, सुक्ष्म नियमांची माहिती देणे, तांत्रिक कौशल्य सुधारणा, टुर्नामेंटचे स्टॅंडर्डायझेशन (मानकीकरण) करणे, सहयोग वाढवणे, भविष्यातील नेते विकसीत करणे, बुद्धीबळ Ecosystem (परिसंस्था) वाढवणे, एकूण बुद्धीबळ पायाभूत सुविधा मजबूत करणे इत्यादी उद्दीष्ट या सेमीनारने साधले जातील सेमीनारच्या यशस्वीतेसाठी रवींद्र धर्माधिकारी, प्रवीण ठाकरे, संजय पाटील यांचे सहकार्य लाभले.