मुंबई : देशात कोरोना कालावधीत देखील शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करुन दिली आहे. याच कालावधीत शेअर बाजाराने आपली उच्चांकी गाठत या तेजीमध्ये दिग्गज शेअर्सचा मोठा वाटा राहीला आहे. फ्रंटलाइन शेअर्सने गुंतवणूकदारांना चारपटीने परतावा दिला आहे. हे पाच स्टॉक पुढीलप्रमाणे आहेत.
टाटा स्टील : टाटा स्टिल या स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना 281 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान, शेअरचा भाव 360 रुपये वाढून 1365 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. 1370 रुपये स्टॉकसाठी एका वर्षाचा उच्चांक आहे.
जेएसडब्ल्यु : जेएसडब्लु शेअरने देखील गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारे फायदा करुन दिला आहे. रुटॉकनेदेखील एका वर्षात 235 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान शेअरचा भाव 215 रुपयांनी वाढून 721 रुपयांपर्यंत गेला आहे. 773 रुपये या शेअरचा उच्चांक राहिला आहे.
टाटा मोटार्स : ऑटो सेक्टरमध्ये दिग्गज स्टॉक असलेल्या टाटा मोटार्सने एका वर्षात 167 टक्के परतावा दिला आहे. एका वर्षात या शेअरची किंमत 106 रुपयांनी वाढून 284 रुपये एवढी झाली आहे.
ग्रासीम इंडस्ट्रीज : ग्रासिम इंडस्ट्रीजच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगल्या प्रकारचा फायदा करुन दिला आहे. या शेअरने एका वर्षात 157 टक्के परतावा दिला आहे. दरम्यान शेअरचे मुल्य सहाशे रुपयांनी वाढून 1532 रुपयांपर्यंत गेले आहे.
एसबीआय : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हटली जाणा-या एसबीआयनेदेखील गुंतवणूकदारांचा चांगला फायदा करुन दिला आहे. एका वर्षात या शेअरने 125 टक्के परतावा दिला आहे. वर्षभरात शेअरचे मुल्य 189 रुपयांनी वाढून 425 एवढे झाले आहे.
निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम
जळगाव दि.२५ प्रतिनिधी - गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी...