देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या HDFC ने दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. HDFC ने काही मुदतीच्या कर्जावर MCLR वाढवला आहे. बँकेने MCLR मध्ये 5 बेस पॉईंट म्हणजेच 0.05 टक्के वाढ केली आहे. बँकेचा MCLR वाढवल्याने, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग कर्जाचा EMI वाढेल. म्हणजेच दिवाळीपूर्वी ग्राहकांच्या खिशाला फटका बसू शकतो आणि त्यांच्या गृह आणि कार कर्जाचा ईएमआय वाढू शकतो. हे नवीन दर 7 नोव्हेंबर 2023 पासून लागू मानले जातील.
HDFC बँकेचा रातोरात MCLR 10 bps ने 8.60 टक्क्यांवरून 8.65 टक्क्यांनी वाढवला आहे.
एचडीएफसी बँकेच्या एमसीएलआरमध्ये वाढ झाल्याचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जासह संबंधित सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर दिसून येईल. कर्ज ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना महागडे कर्ज मिळेल. दिवाळीपूर्वी बँकेने हा प्रकार करून ग्राहकांना धक्का दिला आहे.